Supreme Court: राहुल गांधींना दिलासा, संजय राऊतांचं थेट मोदी-शाहांना चॅलेंज!
Supreme Court Verdict Rahul Gandhi: राहुल गांधी यांची खासदारकी गुजरात हायकोर्टाने जो निर्णय दिला होता त्यावर आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यानंतर संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT

Latest News in Maharashtra Politics: मुंबई: मोदी आडनाव (Modi Surname) प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने हे प्रकरण प्रलंबित असेपर्यंत शिक्षेवरील स्थगिती कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यामुळे राहुल गांधींची खासदारकी अबाधित राहणार असून ते आता संसदेच्या अधिवेशनातही सहभागी होऊ शकणार आहेत. कोर्टाचा हा निर्णय काँग्रेससह (Congress) देशातील विरोध पक्षांना मोठा दिलासा देणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या याच निकालानंतर शिवसेना (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुप्रीम कोर्टातील न्यायधीशांचं कौतुक करताना दुसरीकडे भाजपवर निशाणा साधला आहे. टीव्ही नाइन मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मोदी-शाह यांना थेट आव्हान देत त्यांच्या सरकारवर जोरदार हल्ला देखील चढवला आहे. (supreme court gave relief to rahul gandhi gave verdict in favor of gandhi sanjay raut direct challege to modi shah)
राहुल गांधीं ‘सुप्रीम’ दिलासा, मोदींविरोधात राऊतांची तोफ धडाडली..
‘सर्वोच्च न्यायालयात तरी न्याय जिवंत आहे. न्याय मेलेला नाही. काही न्यायमूर्ती ज्यांना आम्ही रामशास्त्री म्हणतो.. तो बाणा आजही त्या न्यायमूर्तींमध्ये आहे. राहुल गांधींना म्हणजे मला कळतच नाही की… कोणत्या कारणासाठी त्यांना शिक्षा ठोठावली?’
‘का.. तर मोदी आडनावावरून त्यांनी एक ‘कोटी’ केली. ठीक आहे.. त्यांच्यावर तुम्ही मानहानीचा खटला तुम्ही दाखल केला.. आमच्यावर देखील असे असंख्य मानहानीचे खटले होत असतात. हायकोर्टाने काय केलं.. हायकोर्टाने सेशन कोर्टाच्या निर्णयावर भूमिका घ्यायला हवी होती. पण गुजरातमधलं कोणतंही कोर्ट.. अगदी हायकोर्टापर्यंत हे जणू त्यांना संविधान, घटना, न्याय.. याच्याशी काडीमात्र संबंध राहिलेला नाही.’
‘काय म्हणाले राहुल गांधी.. ते भाषणाच्या ओघात कर्नाटकात असं म्हणाले की, त्यांना आश्चर्य वाटतं की, सगळ्या चोरांची नावं मोदी कशी? त्यावर लोकं खटला दाखल करू शकतात. एखादा कोणी मोदी असेल तो.. पण त्यामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्द? जे काँग्रेसचे अध्यक्ष होते. हे सगळं ठरवून झालं.. राहुला गांधींना संसदेच्या बाहेर काढण्यासाठी.’
‘ज्या पद्धतीचे हल्ले राहुल गांधींनी केले.. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधींनी जे वातावरण ढवळून काढलं या देशाचं त्याची शिक्षा ती त्यांना दिली. मोदी आडनावावर टीका केल्याची नाही..’
‘या देशाचं नेतृत्व त्यांच्याकडे येताना दिसतंय.. 2024 साली राहुल गांधी आपला तख्तापलट करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्र होतोय.. त्याची शिक्षा ही अशापद्धतीने हायकोर्टाला, कोर्टाला हाताशी धरून दिली.’