सर्वात मोठी बातमी, सुप्रिया सुळे होऊ शकतात NCP च्या कार्याध्यक्ष!
Supriya Sule: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आता सुप्रिया सुळे या कार्याध्यक्ष होण्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर पक्षात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. यावेळी शरद पवार यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांसाठी एक धक्कातंत्र वापरत राजीनाम्याची घोषणा केली. मात्र, या सगळ्या घडामोडीनंतर आत्ता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खात्रीलायक सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष होऊ शकतात. असं झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण राजकारणाला एक नवी दिशा मिळू शकते. याच बातमीबाबत आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊयात. (supriya sule may become the working president of ncp after sharad pawar resignation announcement)
शरद पवारांनी ठरवून केली राजीनाम्याची घोषणा…
शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा ही ठरवून दिली होती. कारण पवारांचं आजचं भाषण हे लिहून आणलेलं होतं. कारण सहसा मराठी भाषण शरद पवार लिहून आणत नाही. मात्र, आज त्यांनी लिहून आणलेलं भाषण वाचलं आणि त्यातच आपल्या निवृत्तीची घोषणा केली. यामुळेच राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांना उपस्थित राहण्याचे आदेश राष्ट्रवादीकडून देण्यात आले होते.
सुप्रिया सुळे होऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष
दरम्यान, आजच्या दिवसातील सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष किंवा कार्यकारी अध्यक्ष होऊ शकतात. जर शरद पवार यांनी विचार बदलला नाही तर अशा पद्धतीचा विचार हा होऊ शकतो. असं सूत्रांकडून समजतं आहे.
हे ही वाचा>> ब्रेकिंग न्यूज: शरद पवारांच्या निर्णयानंतर हाय होल्टेज ड्रामा! जयंत पाटील ढसाढसा रडले
शरद पवार यांनी अचानक निर्णय घेतला का? तर तसं नाही.. शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी म्हणजे सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, प्रतिभा पवार आणि अजित पवार यांना कल्पना देऊनच राजीनाम्याची आज घोषणा केली.










