'आमचा परळी पॅटर्न, इथे रश्मिका आणि प्राजक्ता माळीही येतात...', सुरेश धसांचं बोचरं विधान

मुंबई तक

भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. पाहा ते नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना लगावला टोला
सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना लगावला टोला
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आमदार सुरेश धस यांनी घेतली बीड पोलीस अधिक्षकांची भेट

point

सुरेश धस यांनी पुन्हा एकदा केली धनंजय मुंडेंवर टीका

point

सुरेश धस यांनी केले गंभीर आरोप

Suresh Dhas vs Dhananjay Munde: बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजप आमदार सुरेश धस हे अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात आघाडी उघडली आहे. सुरेश धस यांनी आज (27 डिसेंबर) बीडच्या पोलीस अधिक्षकांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधलं. ज्यामध्ये त्यांनी धनंजय मुंडेंवर बोचरी टीका केली आहे. (this is our parli pattern rashmika mandanna and prajakta mali also come here bjp mla suresh dhas taunts minister dhananjay munde)

'मॅनेजमेंट पॉलिटिक्स.. ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं इथे शिक्षण घ्यावं.. ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंदाना.. अजून काय प्राजक्ता माळी... प्राजक्ता माळीसुद्धा आमच्या इकडे येत असतात.' असं म्हणत सुरेश धस यांनी टोमणा लगावला.

पाहा सुरेश धस नेमकं काय म्हणाले...

बीडमधील पोलीस दलाचं जे खच्चीकरण गेल्या 5 वर्षात झालंय. कोणालाही उचलायचं, अर्ध्या रात्री नेऊन कुठेही टाकायचं. अशा घटना बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. यातलं एक प्रकरण म्हणजे महादेव अॅपच्याबाबतीतील आहे. माझ्या मतदारसंघातील टेंभूर्णी नावाचं गाव आहे. याच गावातील एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचं बँक ट्रान्झेक्शन झालं आहे.

हे ही वाचा>> Exclusive: 'धनू भाऊ दिसत असून आंधळं झाला का? तुमचं 54 हजार फुटावरचं विमान जरा...', सुरेश धस तुफान बरसले

एवढ्या गंभीर प्रकरणात इथे काम करणारे दोन अधिकारी होते. त्यांना बाहेर काढलं गेलं आणि जे निष्क्रिय अधिकारी आहेत त्यांना ठेवलं. मी आज माझं लेखी पत्र दिलं आहे. बीड जिल्ह्याच्या पोलिसांची यादी मागितली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp