Exculsive: 'फडणवीस, बावनकुळेंसाठी 'हा' इशारा पुरेसा', किरीट सोमय्या एवढं थेट बोलले अन्...
Kirit Somaiya on Devendra Fadnavis: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा एकदा थेट इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'कोणाचा अपमान करण्याचा ना फडणवीसांना अधिकार आहे ना बावनकुळे यांना'
किरीट सोमय्या पुन्हा एकदा स्पष्टच बोलले
भाजपमध्ये नेमकं काय चाललंय?
Kirit Somaiya Exclusive Interview: दिपेश त्रिपाठी, मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांना निवडणुकी व्यवस्थापन समितीत घेण्यात आल्यानंतर त्यांनी एक पत्र लिहून प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. कोणतीही चर्चा न करता अशी नियुक्ती करणं हा अपमान आहे. असं खरमरीत पत्र सोमय्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी एक मोठं विधान केलं आहे. (this warning is enough for devendra fadnavis and chandrasekhar bawankule kirit somaiya speaks directly)
मुंबई Tak सोबत Exculsive बातचीत करताना किरीट सोमय्या यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना खडे बोल सुनावले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंना काल दिलेला इशारा पुरेसा आहे. असं म्हणत पुन्हा एकदा सोमय्यांनी फडणवीस आणि बावनकुळेंवर निशाणा साधला.
हे ही वाचा>> Kirit Somaiya: 'अशी अवमानास्पद वागणूक देऊ नका', किरीट सोमय्यांचा लेटरबॉम्ब... भाजपमध्ये मोठी खळबळ
'फडणवीस, बावनकुळेंना अपमान करण्याचा अधिकार नाही...', पाहा सोमय्या नेमकं काय म्हणाले
प्रश्न: तुम्हाला काल समितीत घेतलं होतं, पण तुम्ही पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. हे संपूर्ण प्रकरण काय आहे?
किरीट सोमय्या: कधी-कधी आमचे महाराष्ट्रातील जे काही 2-4 मुख्य नेते आहेत त्यांना आम्हाला जागं करावं लागतं की, कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत ते बघा.. ती लोकं कधी-कधी वाहवत जातात किंवा भटकतात... त्यांना जागेवर आणावं लागतं.. काल मी तेच काम केलंय की, याप्रकारे कोणाचा अपमान करण्याचा ना फडणवीसांना अधिकार आहे ना बावनकुळे यांना आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
कार्यकर्ता हा जमिनीवर चालतो.. मी देखील एक कार्यकर्ता आहे. 18 फेब्रुवारी 2019 ला पक्षाने मला सांगितलं की, उद्धव ठाकरेंसोबत समझोता करायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला बलिदान द्यायचं आहे. मी बलिदान दिलं. मी सामान्य कार्यकर्ता म्हणून माझा जीव तळहातावर घेऊन काम करतो. करत राहीन... विधानसभा निवडणुकीत देखील महायुती सरकारसाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावीन.
हे ही वाचा>> Kirit Somaiya: भाजपमध्ये खळबळ उडवून देणारं सोमय्यांचं 'ते' पत्र जसंच्या तसं...
प्रश्न: तुम्ही ज्यांच्यावर आरोप लावले ती सगळी लोकं आज तुमच्यासोबत आहेत.
किरीट सोमय्या: हा सवाल जनताही मला विचारते. एकीकडे आम्हाला विकास हवा होता आणि दुसरीकडे तडजोड देखील करावी लागणार होती. तडजोड केली त्याची किंमत लोकसभेला चुकवावी लागलीए. आता विधानसभेत पुन्हा एकदा आम्ही केवळ विकास हाच मुद्दा घेऊन जनतेसमोर जात आहोत.
ADVERTISEMENT
प्रश्न: भाजपने जी तडजोड केली त्याचे परिणाम त्यांना लोकसभेत भोगावे लागले. आता विधानसभा निवडणुकीत देखील तसाच परिणाम होईल?
किरीट सोमय्या: आम्ही सगळे शिकत आहोत. धडाही घेतलाय.. त्यामुळे विधानसभेत अधिक तीव्रतेने मेहनत करून अहंकार बाजूला ठेवू आणि एक विकास.. लाडकी बहीण ही विकासाची एक योजना आहे. मुंबईसाठी मुंबई मेट्रो.. कोस्टल रोड ही कामं किती वेगाने सुरू आहेत. त्यामुळे विकासाची कामं घेऊन जनतेसमोर जात आहोत.
ADVERTISEMENT
प्रश्न: तुम्ही केंद्रातील नेतृत्त्वाकडे काही तक्रारी केल्या आहेत का?
किरीट सोमय्या: काही गरज नाही.. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंसाठी हा इशारा पुरेसा आहे.
प्रश्न: येत्या काळात तुमच्याकडून काय इशारा असू शकतो?
किरीट सोमय्या: काही नाही.. फक्त विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जायचं आहे. आता अशा प्रकारच्या व्यक्तींसोबत तडजोड करायची नाही. जरी तो भाजपमध्ये असेल तरी. अशी तडजोड कार्यकर्ते मान्य करणार नाहीत.
ADVERTISEMENT