Maha Vikas Aghadi : ठाकरे-काँग्रेसमध्ये घमासान, 'ही' जागा मविआत ठरतेय बिब्बा?

साहिल जोशी

sangli lok sabha constituency : ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केला असला, तरी काँग्रेस अजूनही सांगली लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडताना दिसत नाहीये.

ADVERTISEMENT

सांगली लोकसभा मतदारसंघावर ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच.
ठाकरेंनी सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सांगली लोकसभा मतदारसंघ २०२४

point

महाविकास आघाडीतील दोन पक्षात रस्सीखेच

point

ठाकरे सांगलीतून लढवण्यावर ठाम

Lok Sabha election Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीमध्ये आता जागावाटपावर कोणतीही चर्चा होणार नसल्याचे शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा आपली असल्याचे सांगून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. पण काँग्रेस सांगलीच्या जागेवर तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सांगलीतून काँग्रेसचे उमेदवार आहेत. हा मतदारसंघ अनेक वर्षे काँग्रेसचा बाल्लेकिल्ला राहिलेला आहे. हीच जागा आता मविआत बिब्बा ठरते की काय? अशी चर्चा सुरू आहे. (why are both Congress and Shiv Sena (UBT) laying claim to Sangli?)

महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या काँग्रेस आणि ठाकरेंची सेना एका जागेवर आमने-सामने आली आहे. ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतर मैत्रीपूर्ण लढतीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. महायुतीचे आव्हान समोर असताना उद्भवलेली ही स्थिती महाविकास आघाडीसाठी चिंताजनक आहे. कारण त्यामुळे महाराष्ट्रातील इतर जागांसाठीही अडचणी निर्माण होणार आहेत. 
पण, काँग्रेस आणि शिवसेना (UBT) दोन्ही पक्ष सांगलीवर दावा का करत आहेत? याची अनेक कारणे आहेत...

कोल्हापूरची जागा, पश्चिम महाराष्ट्रातील स्थान

कोल्हापूरच्या जागेमुळे हा प्रश्न निर्माण झाला. शिवसेनेचे (UBT) म्हणणे आहे की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी लढलेल्या आणि जिंकलेल्या जागांपैकी ही एक आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा युक्तिवाद असा आहे की, मुंबई आणि कोकण विभागाच्या आसपासच्या भागात त्यांना लोकांचा चांगला पाठिंबा आहे.

दरम्यान, काँग्रेस विदर्भात बलाढ्य आहे, त्यामुळे तिथे जागा मिळाल्या पाहिजेत, असे काँग्रेसने म्हटले होते. त्यामुळे 2019 मध्ये शिवसेनेने लढवलेल्या अमरावती आणि रामटेक या जागा काँग्रेसला देण्यात आल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp