Uddhav Thackeary : विधानसभेच्या हालचाली! ठाकरेंचा तीन दिवस दिल्लीत मुक्काम
Uddhav Thackeray Delhi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे. त्यात आता ठाकरे तीन दिवस दिल्लीत असणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर
राहुल गांधी, सोनिया गांधींची घेणार भेट
विधानसभा जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता
Uddhav Thackeray Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, सगळेच तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोर्चेबांधणी सुरू असून, महाविकास आघाडीच्या जागावाटपाआधी ठाकरे तीन दिवस दिल्लीत मुक्काम करणार आहे. दिल्लीत दौऱ्यात ठाकरे काही नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. (Uddhav Thackeray on three day delhi tour)
महाविकास आघाडीत सध्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. अशात उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्लीत असणार आहे. उद्धव ठाकरेंबरोबर शरद पवारही दिल्ली दौऱ्यावर आहेत.
उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा कशासाठी?
दिल्लीत दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरेही असणार आहेत. तीन दिवसाच्या दिल्ली मुक्कामात उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> सचिन वाझेंच्या 'त्या' लेटरबॉम्बमध्ये जयंत पाटलांचं नाव कसं आलं?
विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह तृणमूल काँग्रेस, समाजावादी पक्ष आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांच्या भेटी उद्धव ठाकरे घेणार असल्याचे समजते. महत्त्वाची बाब म्हणजे ठाकरे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशीही चर्चा करणार आहेत.
काँग्रेस नेतृत्वासोबत जागावाटपाबद्दल चर्चा?
उद्धव ठाकरे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि रमेश चेन्निथला यांच्या भेटी दिल्ली दौऱ्यात घेणार आहेत. या भेटीदरम्यान, विधानसभा जागावाटप लवकर करण्याच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ठाकरेंच्या शिवसेनेला हव्यात इतक्या जागा?
उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे सुरू केले असून, राज्यातील सर्वच विभागातील जागांचा आढावा घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत ११५ ते ११५ जागा हव्यात आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत कलह, थेट राजीनामे... नेमकं काय घडलं?
महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. तर विधानसभेच्या जागा २८८ आहेत. अशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांसह इतर छोटे पक्षही आहेत. त्यांचा विचारही महाविकास आघाडीला करावा लागणार आहे.
ADVERTISEMENT