BJP : "तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही", भाजपचा ठाकरेंवर हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्धव ठाकरे
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

point

चंद्रशेखर बावनकुळे यांनी चढवला हल्ला

point

जनाब म्हणत ठाकरेंना पुन्हा डिवचलं

Uddhav Thackeray Chandrashekhar Bawankule : शिवसेनेच्या (युबीटी) भगवा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केले. ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर भाजपने प्रतिहल्ला चढवला. जनाब उद्धव ठाकरे, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 

ADVERTISEMENT

"तुम्ही औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहताय" 

ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "औरंगजेब फॅन क्लबचे म्होरके जनाब उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन राममुक्त भाजप करायची बोंब ठोकली. पण हे तुम्हाला या जन्मात तरी शक्य होणार नाही. कारण तुम्ही मतांसाठी उबाठा गट हिरवा करून घेतला. छत्रपती शिवरायांचा वारसा सोडून तुम्ही औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहात", असे टीकास्त्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर डागलं.

हेही वाचा >> भारतात खळबळ! "सेबी अध्यक्षांच्या परदेशात बनावट कंपन्या; अदाणी समूहाशी संबंध" 

"हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुमच्या सारख्या औरंगजेबी वृत्तीला कशी धूळ चारायची हे इथल्या मावळ्यांना ठावूक आहे. आता तर शिवरायांची वाघनखंही महाराष्ट्रात आलीत, त्यामुळे यांचं वाघनखांच्या साक्षीनं येणाऱ्या निवडणुकीत मतांच्या शस्त्रानं जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही", असा पलटवार बावनकुळे यांनी ठाकरेंवर केला. 

हे वाचलं का?

हिरवे झेंडे जनता विसरली नाही -बावनकुळे

"लांड्या, लबाड्या आणि धूळफेक करून तुम्ही जास्त दिवस लोकांना फसवू शकणार नाहीत. तुमच्या रॅलीतील हिरवे झेंडे जनता विसरली नाही. 'लोकसभेला आम्ही तुमचे नऊ खासदार निवडून दिले मग वक्फ बोर्डाची बाजू का घेत नाही?' असं म्हणत मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजानं आंदोलनही केलं", असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंच्या सभेदरम्यान ठाण्यात तुफान राडा, काय घडलं? 

"भगवं सोडून हिरवं पांघरलं की असंच होणार आहे. ही सुरुवात आहे तुमच्या अधोगतीची. वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना विसरलात, जनता तुम्हाला माफ करणार नाही", असे उत्तर बावनकुळे यांनी ठाकरेंना दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळे यांन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. औरंगजेब फ्लॅन क्लबचे अध्यक्ष असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT