उद्धव ठाकरेंचा राजीनामा, भाजपचा पुढचा प्लान काय?; फडणवीस-शिंदे यांच्याकडे लक्ष

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बुधवारी कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद करतानाच राजीनामा देत असल्याची घोषणा केली. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण असून, देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री पदाबरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

Uddhav Thackeray: “मी आज सगळ्या महाराष्ट्राच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाचा त्याग करतो आहे”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण असून, आज भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केल्या जाण्याची शक्यता आहे. फडणवीस आज पुढील भूमिका जाहीर करणार असून, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडंही सगळ्यांचं लक्ष आहे.

भाजपचं पुढचं पाऊल काय असेल? याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना माध्यमांनी विचारलं असता, पाटील म्हणाले, ‘पुढे काय निर्णय घ्यायचा. हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे ठरवतील.’ दरम्यान, भाजपने सर्व आमदारांना मुंबईत येण्यास सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी का मानले शरद पवारांचे आभार?

ADVERTISEMENT

…मुंबई अभी बाकी है

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबई भाजपने ट्विट करत मुंबई महापालिकेची सत्ता घेणार असल्याचे म्हटलंय. ‘ये तो सिर्फ झांकी है, मुंबई महापालिका अभी बाकी है’ असं मुंबई भाजपने म्हटलंय. त्यामुळे राज्यातील सत्ता हाती घेतल्यानंतर भाजपचं लक्ष मुंबई महापालिकेकडे असल्याचं दिसत आहे.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक

ठाकरे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुरूवारी (३० जून) भूमिका स्पष्ट करू. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भाजपनं कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत भाजप पुढची दिशा ठरवणार आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताच पेढे भरवत भाजपचा जल्लोष!

शिंदे गटातील आमदार पोहोचले गोव्यात

शिवसेनाविरोधात बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे अनेक आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. आठवडाभर गुवाहाटीत मुक्काम ठोकल्यानंतर शिवसेनेचे आमदार बुधवारी रात्री गोव्यात आले. आज हे आमदार बहुमत चाचणीसाठी मुंबईत येणार होते, पण विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला अन् सरकार कोसळलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT