Uddhav Thackeray : ''नितीनजी सोडून द्या भाजपा, MVAतून तुम्हाला निवडून आणतो', ठाकरेंची गडकरींना ऑफर

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

Udhhav thackeray offer nitin gadkari on contest lok sabha election maha vikas aghadi umarga maharashtra politics
भाजप रूजवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, अगदी प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांच्यानंतर युतीमध्ये मेहनत घेतली, त्या नितीन गडकरींचे नाव या यादीत नसल्याची खंत ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.
social share
google news

Udhhav Thackeray offer Nitin Gadkari Lok Sabha Election 2024  : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली.या यादीत 195 उमेवारांचा समावेश करण्यात आलाय. मात्र पहिल्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना स्थान मिळालं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रचंड चिडले आहे. यातूनत त्यांनी नितीन गडकरीजी तुम्ही भाजपा सोडा, तुम्हाला महाविकास आघाडीतून निवडून आणतो, अशी ऑफर ठाकरेंनी नितीन गडकरींना दिली आहे.  (Udhhav thackeray offer nitin gadkari on contest lok sabha election maha vikas aghadi umarga maharashtra politics) 
 
उद्धव ठाकरे उमरगामध्ये बोलत होते. यावेळी ठाकरेंनी नितीन गडकरींना महाविकास आघाडीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, भाजपने 195 जणांची यादी जाहीर केली होती. यात नरेंद्र मोदी, अमित शाहांच नावं आहे. या यादीत कृपाशंकरचंही नाव आहे...कोण आहे माहितीय? काँग्रेसमधून यांच्या उरावरती आलेला. यांच्याच विरोधात बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी भाजप बोबंली होती. आता त्याच नेत्याचे नाव नरेंद्र मोदींसोबत असल्याचे ठाकरेंनी यावेळी सांगितले. 

हे ही वाचा : 'आम्ही 115 तरी तुम्हाला..', फडणवीसांनी एका वाक्यात..

पण ज्यानी भाजप रूजवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, अगदी प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांच्यानंतर युतीमध्ये मेहनत घेतली, त्या नितीन गडकरींचे नाव या यादीत नसल्याची खंत ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली. ''नितीनजी सोडून द्या भाजपा, राहा उभे महाविकास आघाडीतून, आम्ही तुम्हाला निवडून आणतो'' यांना महाराष्ट्राच पाणी दाखवा, महाराष्ट्राची धमक दाखवा, महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही, द्या राजीनामा...आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो,अशी थेट ऑफरच ठाकरेंनी गडकरींना दिली आहे. ठाकरेंच्या या ऑफरवर आता गडकरी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हे ही वाचा : 'शरद पवार म्हणतात मला...' यावर अजितदादा काय म्हणाले?

मुख्यमंत्री शिंदेंवर डागलं टीकास्त्र 

'हे मिंधे लाचार शेपूट हलवत, त्यांची खुर्ची चाटत भिकेचे कटारे घेऊन बसले आहेत. त्यांच्या डोळ्यादेखत छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेतायत', अशी टीका ठाकरेंनी शिंदेंवर केली.  'सरकारला आता दोन वर्ष होत आली, पावने दोन वर्ष झाली.घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रावर राज्य करतेय, महाराष्ट्र लुटला जातोय आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि सरकार या लुटालुटीत सामील होत आहे आणि तरीसुद्धा आम्ही त्याला मतं द्यायची. इतकी लाचारी महाराष्ट्रात कधी झाली नव्हती. आणि एवढा लालघोटेपणा यापुर्वी महाराष्ट्रात कधी पाहायला नव्हता,अशी टीका देखील ठाकरेंनी यावेळी केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT