No Confidence Motion : नंबर गेम, ‘इंडिया’ची स्ट्रॅटजी, तुमच्या 10 प्रश्नांची उत्तरे
अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? अविश्वास प्रस्ताव कधी आणला जातो? अविश्वास प्रस्ताव कोणत्या नियमानुसार मांडला जातो?
ADVERTISEMENT

What is a no confidence motion? : लोकसभा 2024 च्या निवडणुकीपूर्वीच राजकीय चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. कोणता पक्ष कोणत्या गटात असेल, हेही स्पष्ट होईल. कारण संसदेत मोदी सरकारविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर कोण कोणत्या बाजूला असेल? तीन दिवसांत 18 तासांची चर्चा होईल, यामध्ये 2024 च्या राजकीय लढाईचा ट्रेलर दिसेल. (Complete process of No Confidence Motion)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागणार आहे. खासदारांच्या आकड्यांवर नजर टाकली, तर स्पष्ट दिसत आहे की, सरकारला कोणताही धोका नाही. पण एकूणच विरोधकांना मणिपूरवर मोदी सरकारला कोंडीत पकडायचे आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव काय आहे आणि त्याचा भूतकाळातील इतिहास काय आहे आणि विरोधकांसाठी त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेऊयात…
1) प्रश्न – अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय?
उत्तर – एका विशिष्ट मुद्द्यावरून विरोधक सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणतात. जसा मणिपूर हिंसाचारावरून आणला गेला. लोकसभेचे खासदार त्या विषयावर नोटीस देतात. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी यावेळी दिलीये. नोटीस दिल्यानंतर लोकसभा अध्यक्ष सभागृहात त्याचे वाचन करतात. यावेळीही तसेच झाले. मग त्या नोटीसला 50 खासदारांचा पाठिंबा मिळाला, तर चर्चा होते. गौरव गोगोई यांनी दिलेल्या नोटिशीला पन्नास खासदारांनी पाठिंबा दिला, आता त्यावर चर्चा होणार असून, चर्चेनंतर मतदानही होणार आहे. चर्चेत विरोधकांच्या वतीने आरोप केले जातील आणि त्या आरोपांना सरकारकडून उत्तर दिले जाईल. चर्चेनंतर मतदान होतं.
2) प्रश्न- अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी किती खासदारांची आवश्यकता असते?
उत्तर – लोकसभा नियम १९८ अन्वये सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. हा अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी सुमारे 50 विरोधी खासदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. लोकसभेत सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.