राज ठाकरेंनी निवडून आणलेले 13 आमदार सध्या आहेत कुठे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

राज ठाकरेंचे 13 आमदार सध्या आहेत कुठे?
राज ठाकरेंचे 13 आमदार सध्या आहेत कुठे?
social share
google news

Raj Thackeray 13 elected MLAs : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची गुढी पाडव्याची सभा शिवाजी पार्कवर पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. त्याचबरोबर मनसेवर होणाऱ्या टिकेचा देखील त्यांनी समाचार घेतला. मनसे हा संपलेला पक्ष आहे अशी टीका मनसेवर होत असते त्यावर गर्दीकडे बोट दाखवत हा संपलेला पक्ष आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.२००५ मध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर २००९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मनसेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांचे तब्बल १३ आमदार निवडूण आले. असं असलं तरी पुढच्या काळात पक्षाला उतरती कळा लागली. सध्या मनसेचे एकच आमदार आहेत. ज्या पहिल्या निवडणुकीत १३ आमदार निवडूण आले होते, ते १३ आमदार सध्या कुठे आहेत, हेच आपण जाणून घेणार आहोत.(where are the 13 mlas elected by raj thackeray now)

ADVERTISEMENT

बाळा नांदगावकर: बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) हे राज ठाकरे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत समजले जातात. बाळा नांदगावकर यांना मनसेतून 2009 विधानसभा तिकिट देण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत त्यांचाही पराभव झालेला.

नितीन सरदेसाई: नितीन सरदेसाई हे 2009 मध्ये माहिम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. ते आजही राज ठाकरेंसोबत कायम असल्याचं पाहायला मिळतं.

हे वाचलं का?

राम कदम: 2009 मध्ये राम कदम (Ram Kadam) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले. त्यावेळी शपथ विधीमध्ये मराठीत शपथ घेतली नाही म्हणून अबू आझमीच्या कानशिलात लगावली होती. ज्यानंतर राम कदम राज्याच्या यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राम कदम यांनी मनसेला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

ADVERTISEMENT

रमेश वांजळे: राज ठाकरेंचा ढाण्या वाघ आणि गोल्डन मॅन अशी रमेश वांजळे यांची ओळख होती. सामान्य नागरिक असलेल्या रमेश वांजळे यांचा आमदार होण्यापर्यंतचा राजकीय प्रवास फारच रंजक होता. वांजळे हे आपल्या अंगावरील प्रचंड सोन्यामुळे खूप प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, 2011 साली रमेश वांजळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे राज ठाकरेंनी आपला एक बिनीची शिलेदारही गमावला.

ADVERTISEMENT

हर्षवर्धन जाधव नव्या पक्षात; राजकीय निवृत्तीची घोषणा विसरुन पुन्हा सक्रिय

मंगेश सांगळे: 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मंगेश सांगळे मनसेच्या तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, 2017 साली मंगेश सांगळे यांनी मनसेला राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला होता.

शिशिर शिंदे: शिशिर शिंदे हे राज ठाकरे यांच्यासह शिवसेनेतून बाहेर पडले होते. ते मनसेच्या तिकिटावर २००९ मध्ये आमदार झाले होते. 1992 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान बाळासाहेबांच्या आदेशानुसार त्यांनी वानखेडे स्टेडियमवरील धावपट्टी काढून टाकण्यात त्यांचा पुढाकार होता. मात्र 2022 साली शिशिर शिंदे मनसे सोडून शिवसेनेत गेले होते.

नितीन भोसले: नाशिकचे नितीन भोसले हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. पण 2014 आणि 2019 अशाल सलग दोन विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, ते अद्यापही मनसेसोबतच असून नाशिकमध्ये पक्षाचं काम करत आहेत.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस ठरवून एकत्र आले? ठाकरेंना टोला लगावत राऊतांनी दिलं उत्तर

रमेश रतन पाटील: रमेश रतन पाटील हे 2009 मध्ये कल्याण ग्रामीणचे आमदार म्हणून विधानसभेवर मनसेकडून निवडून गेले होते. त्यांनी काँग्रेसमधून मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. काही काळ भाजपमध्ये घालवल्यावर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. आता मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांचे ते मोठे बंधू आहेत.

प्रविण दरेकर: विधान परिषदेचे आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर आमदार झाले होते. राज ठाकरेंसोबत शिवसेना सोडण्याऱ्यांमध्ये प्रविण दरेकर यांचा समावेश होता. पण 2014 मधील पराभवानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला.

वसंत गीते: वसंत गीते हे 2009 मध्ये मनसेकडून नाशिक मध्यचे आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, 2014 मध्ये मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवताना त्यांच्या पदरी अपयश आलं होतं. त्यानंतर त्यांनी मनसेची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मनसे पक्ष का सोडला?

“उद्धवजी, पुन्हा एकदा शांतीने विचार करा”, फडणवीसांची भेट, सुधीर मुनगंटीवारांची ऑफर?

हर्षवर्धन जाधव: हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेले. त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम करत 2014 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलेला. त्यावेळीही ते निवडणूक जिंकले होते. दरम्यान, 2019 साली विधानसभा त्यांनी अपक्ष लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झालेला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा 2020 मध्ये मनसेत प्रवेश केला होता. मात्र, आता ते मनसे सक्रीय नसल्याचं पाहायला मिळतंय.

प्रकाश भोईर: प्रकाश भोईर हे 2009 मध्ये कल्याण विधानसभा मतदासंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. 2014 आणि 2019 अशा दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांना मनसेने तिकीट दिलं होतं. परंतु दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला. मात्र, तरीही त्यांनी मनसेची साथ सोडली नाही. ते आजही पक्षात कार्यरत असून त्यांचा कल्याण मतदारसंघात पक्षात बराच दबदबा आहे.

ॲड. उत्तमराव ढिकले: उत्तमराव ढिकले हे 2009 साली नाशिकमधून मनसेच्या तिकिटावर आमदार झाले होते. 2014 ची निवडणूक त्यांनी लढवली नाही. एप्रिल 2015 मध्ये त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT