Mayawati : बसपा अध्यक्षा मायावतींचा वारसदार ठरला! कोण आहे आकाश आनंद?
Mayawati Successor : बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) सुप्रीमो मायावती यांनी आज लखनौमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसपाच्या बैठकीत मायावतींनी त्यांचा पुतण्या आकाश आनंदला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.
ADVERTISEMENT

Mayawati successor Akash Anand : बसपा अर्थात बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी एक मोठी घोषणा केली. बहुजन समाज पक्षाची बैठक लखनौमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकी मायावती यांनी त्यांच्या वारसदाराची घोषणा केली. आकाश आनंद यांच्या नावाची उत्तराधिकारी मायावतींनी घोषणा केली. (Mayawati announces Akash Anand name as her successor)
बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) सुप्रीमो मायावती यांनी आज लखनौमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत मोठा निर्णय जाहीर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसपाच्या या बैठकीत मायावतींनी सर्वांसमोर घोषणा केली की, बसपामध्ये त्यांचा उत्तराधिकारी आकाश आनंद असेल. या बैठकीत मायावतींनी पक्षाच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि आता राज्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना बोलावले आहे.
हेही वाचा >> इंदापुरात आमदार पडळकरांवर भिरकावल्या चप्पला; भुजबळ भडकले
मायावती आज (10 डिसेंबर) सकाळी त्यांचा भाचा आकाश आनंदसोबत बैठकीला पोहोचल्या. अलीकडेच बसपाने आकाश आनंद यांच्याकडे चार राज्यांची जबाबदारी सोपवली होती. गेल्या 6 वर्षांपासून आकाश आनंद यांची पक्षातील सक्रियता वाढत आहे.
सुरूवातीला मायावतींनी आकाशची त्यांच्यासोबत व्यासपीठावर ओळख करून दिली. मायावतींनी आकाश आनंद यांना पक्ष समन्वयकासारखे महत्त्वाचे पद दिले होते. आकाश यांनी इतर राज्यात संघटनेच्या बैठका आणि सभा घेतल्या होत्या.










