Who is Baba Siddique: भर रस्त्यात हत्या झालेले बाबा सिद्दीकी नेमके होते तरी कोण?, बॉलिवूडमध्येही...

रोहित गोळे

Baba Siddique Death: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने एकच खळबळ माजली आहे. जाणून घ्या नेमके कोण होते बाबा सिद्दीकी आणि कसा होता त्यांचा राजकीय प्रवास.

ADVERTISEMENT

बाबा सिद्दीकी नेमके होते तरी कोण? (फाइल फोटो)
बाबा सिद्दीकी नेमके होते तरी कोण? (फाइल फोटो)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकींची हत्या

point

गोळीबारात झाला बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू

point

बाबा सिद्दीकी नेमके कोण होते?

Baba Siddique Death News: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी  यांची आज (12 ऑक्टोबर) रात्री 9.30 वाजेच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने अवघ्या मुंबई आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. (who was baba siddique who was killed in the shooting there was a lot of influence in bollywood too)

आपल्या इफ्तार पार्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेले बाबा सिद्दीकी यांचे अनेक दिग्गज सेलिब्रिटींसोबत अगदी जवळचे संबंध होते. एका घड्याळ दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा ते एक दिग्गज नेता असा बाबा सिद्दीकी यांचा आजवरचा प्रवास होता. जाणून घ्या नेमके कोण होते बाबा सिद्दीकी. 

सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यात समेट घडवून आणणारी व्यक्ती म्हणून बाबा सिद्दीकी हे सर्वात आधी चर्चेत आले होते. कारण त्यांच्याच इफ्तार पार्टीमध्ये बॉलिवूडच्या या स्टार्सचा समेट झाला होता. तेव्हापासून बाबा सिद्दीकी यांचं राजकीय वजन बरंच वाढलं होतं. 

काय आहे बाबा सिद्दीकींची नेमकी कहाणी

बाबा सिद्दीकी यांचे वडील वांद्रे येथे घड्याळ बनवण्याचे काम करायचे. सिद्दीकी हे देखील आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करत असे. पण शिक्षण सुरू असतानाच बाबा सिद्दीक यांना राजकारणात रस निर्माण झाला. 1977 साली ते NSUI मुंबईचे सदस्य झाले. 1980 साली त्यांना वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि 1982 साली अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मुंबई महापालिकेत प्रवेश झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp