Maharashtra CM: कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री? फडणवीस की मोहोळ? 'या' तारखेला उधळणार गुलाल!

योगेश पांडे

ADVERTISEMENT

Who Will Be Maharashtra Next CM?
Who Will Be Maharashtra Next CM?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोण असेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

point

'या' नावाची होतेय तुफान चर्चा

point

'या' तारखेला आझाद मैदानात होणार शपथविधी सोहळा

Maharashtra CM Face Latest News Update: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता सर्वांनाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे वेध लागले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असतानाच एकनाथ शिंदे अचानक साताऱ्या जिल्ह्यात त्यांच्या दरेगावात गेले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मुरलीधल मोहोळ राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी तुफान चर्चा सोशल मीडियावर रंगली. मात्र, मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून त्यांच्या नावाची होणारी चर्चा निरर्थक असल्याचं ट्वीटरवर स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत अजूनही अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. असं असतानाही मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याची तारीख समोर आलीय. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 डिसेंबरला भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. यावेळी आमदार विधिमंडळ नेत्याची नियुक्ती करणार आहेत. त्यानंतर 5 डिसेंबरला आझाद मैदानात दुपारी 1 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अनेक मुख्यमंत्री आणि नेते सहभागी होणार आहेत. कोणत्या नेत्याला कोणतं खातं मिळेल, याबाबत तिन्ही पक्षांचे नेते निर्णय घेणार असून पुढील फॉर्म्युलाही जाहीर करणार असल्याचं समजते. सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून महायुतीत गोंधळ उडाला असून शिंदे गटाने केलेल्या मागणीची चर्चा रंगलीय. शिवसेना शिंदे गटाने गृह मंत्रालय त्यांच्याकडे असावं, अशी मागणी केलीय.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Uddhav Thackeray Pune : "बाबांच्या आंदोलनात जिंकलेले लोकही येतायत, म्हणजे त्यांचाही निकालावर विश्वास नाही"

शिवसेनेचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, राज्याच्या नवीन सरकारमध्ये शिवसेनेला गृह विभाग मिळालं पाहिजे. गृह विभाग सामान्यपणे उपमुख्यमंत्र्यांकडे असतो. दरम्यान, महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीय. भाजपचे हायकमांड जातीय समीकरणं लक्षात घेऊन एनडीएच्या घटक पक्षांसोबत चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेतील, असं बोललं जात आहे. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यात मिळणार 6 व्या हफ्त्याचे 1500?

'असा' असेल खाते वाटपाचा फॉर्म्युला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारमध्ये खातेवाटपासाठी महायुतीतील घटकपक्षांना सहा आमदारांवर एक मंत्रीपद देण्याच्या फॉर्म्युल्याबाबत विचार केला जाईल. यानुसार, भाजपकडे जवळपास 21 ते 22 मंत्रीपद, शिवसेना शिंदे गटाला 10 ते 12 मंत्रालय आणि अजित पवार एनसीपी गटाला जवळपास 8-9 मंत्रालय दिले जातील. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT