Maharashtra New CM: मोठी बातमी! भाजपकडून थेट शपथविधीची तारीख जाहीर, पण मुख्यमंत्री...
भाजपकडून अद्याप महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याची माहिती देण्यात आलेली नसली तरी आता नव्या सरकारच्या शपथविधी तारीख आणि वेळ मात्र घोषित करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महायुतीच्या सरकारचा शपथविधी ठरला

पाहा नव्या सरकारचा शपथविधी कुठे होणार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती
मुंबई: महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण दुसरीकडे नव्या मुख्यमंत्र्यांचा आणि सरकारचा शपथविधी सोहळ्याची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवरून नव्या सरकारच्या शपथविधीची माहिती दिली आहे. (who will be the maharashtra new chief minister is still in the bag but the bjp has announced the date, time and venue of the swearing in ceremony)
23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जाहीर झाला. पण अद्यापही मुख्यमंत्री कोण होणार याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असं असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शपथविधीची तारीख, वेळ आणि ठिकाणच जाहीर केलं आहे.
हे ही वाचा>> Maharashtra CM: कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री? फडणवीस की मोहोळ? 'या' तारखेला उधळणार गुलाल!
'इथे' होणार नव्या सरकारचा शपथविधी
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.