अर्थसंकल्प: राज्यमंत्रीच नाही विधान परिषदेत कोण मांडणार बजेट? शिंदे-फडणवीसही गडबडले
Who will Present budget in legislative council: मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) हे आजपासून (27 फेब्रुवारी) सुरू झालं आहे. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अर्थमंत्री (Finance Minister) म्हणून पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात ते महाराष्ट्राला काय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. पण असं असलं तरी विधान परिषदेत (Legislative Council) […]
ADVERTISEMENT
Who will Present budget in legislative council: मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) हे आजपासून (27 फेब्रुवारी) सुरू झालं आहे. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अर्थमंत्री (Finance Minister) म्हणून पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात ते महाराष्ट्राला काय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. पण असं असलं तरी विधान परिषदेत (Legislative Council) हा अर्थसंकल्प (Budget) कोण सादर करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणतंही ठोस उत्तर देण्यात आलं नाही. (who will present budget in legislative council what did cm shinde and dcm devendra fadnavis answer)
ADVERTISEMENT
आतापर्यंतच्या संसदीय प्रथेप्रमाणे राज्याचं अर्थसंकल्प हे अर्थमंत्री विधानसभेत सादर करतात तर अर्थ राज्यमंत्री हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतात. पण, आता ही परंपरा मोडीत निघणार आहे. कारण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये फक्त कॅबिनेट मंत्री आहेत.
शिंदेंच्या पहिल्या मंत्रिमंडळात फक्त 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. हे 18 ही मंत्री कॅबिनेट दर्जाचे आहेत. यात एकाही राज्यमंत्र्याचा समावेश करण्यात आलेला नाही. सरकारला सत्तेत येऊन 8 महिने झाले. पण, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशावेळी राज्याच्या मंत्रिमंडळात आता अर्थ राज्यमंत्रीच नाहीत. त्यामळे विधान परिषदेत अर्थसंकल्प नेमका कोण सादर करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे वाचलं का?
Exclusive : ठाकरेंआधी शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला वार; गोऱ्हेंना दिलं पत्र
याबाबत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना कोणतंही ठोस उत्तर देता आलं नाही.
ADVERTISEMENT
जेव्हा हा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला तेव्हा शिंदेंनी हा प्रश्न फडणवीसांकडे टोलावला. तेव्हा फडणवीसांनी देखील फारसं काही उत्तर न देता.. विधान परिषदेत कोणाला तरी नॉमिनेट करू एवढंच उत्तर देत त्यांनी वेळ मारून नेली.
ADVERTISEMENT
Shiv Sena : शिंदेंचा व्हीप ‘ऋतुजा लटकेंना लागू होणार? कायदा काय सांगतो?
आता शिंदे सरकारमध्ये फक्त 18 कॅबिनेट मंत्री आहेत. अनेकांकडे एकापेक्षा अधिक खाती आहेत. आता राज्यमंत्री नेमायचं म्हटल्यावर या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एकावर ही जबाबदारी सोपवणार की आणखी दुसऱ्या कोणाला संधी देणार? हे बघणं महत्वाचं आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?
अर्थसंकल्पाच्या वाचनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? हा सवाल उपस्थित झाला आहे. सरकार स्थापन होऊन 8 महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, अद्यापही विस्तार झालेला नाही. एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी केलेले अनेक आमदार हे मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. त्यातील काही जणांना पहिल्या विस्तारातच मंत्रिपद मिळालं आहे. मात्र, अनेक आमदार हे मंत्रिपदासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. अशावेळी शिंदे आणि फडणवीस हे मंत्रिमंडळाचा नेमका विस्तार कधी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.त
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT