Uddhav Thackeray : रघुराम राजन यांनी घेतली ठाकरेंची भेट; प्लॅन काय?
रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरेंची सदीच्छा भेट घेतली असं सांगण्यात आलं. पण, राजकारणात सदीच्छा भेटीतही राजकीय चर्चा होतात
ADVERTISEMENT
Rajya Sabha 2024 Election : कधीही राजकारण्यांसोबत न दिसणारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा एक फोटो समोर आला. फोटो होता मातोश्रीवरील आणि फोटोत होते उद्धव ठाकरे! हा फोटो बघून अनेकांना प्रश्न पडला की, रघुराम राजन उद्धव ठाकरेंचा भेटीला कसे. इतक्या वर्षांनंतर रघुराम राजन यांची पावले मातोश्रीच्या दिशेने कशी गेली? नेमकं काय सुरूये हेच जाणून घ्या… (Why did Raghuram Rajan meet Uddhav Thackeray)
ADVERTISEMENT
राज्यसभेच्या निवडणुका होताहेत. महाराष्ट्रातून सहा खासदार निवडून द्यायचे आहेत. निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन खासदार आहेत.
पण, बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे सध्या महाविकास आघाडीला एकच उमेदवार राज्यसभेवर पाठवता येणार आहे, तर महायुतीला पाच उमेदवार राज्यसभेवर पाठवता येतील.
हे वाचलं का?
महाविकास आघाडीतून फक्त काँग्रेसचा उमेदवार राज्यसभेवर जाईल. कारण, काँग्रेसकडे ४४ मतं आहेत आणि मतांचा कोटा आहे ४२ आहे. पण, आता काँग्रेसचा उमेदवार कोण असेल? असे प्रश्न उपस्थित होताहेत आणि याच प्रश्नांमुळे रघुराम राजन आणि उद्धव ठाकरेंची भेट महत्त्वाची ठरते.
राज्यसभा निवडणूक २०२४ : ठाकरे-पवारांकडे किती मते?
राज्यसभेची निवडणूक लागताच भेटीगाठी सुरू झाल्या. कोण कोणाकडून उमेदवार असतील याची चर्चा सुरू झाली. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे १६ मतं आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे ९ मतं. त्यामुळे त्यांना त्यांचे उमेदवार राज्यसभेवर पाठवता येणार नाही.
ADVERTISEMENT
काँग्रेसकडून एक उमेदवार राज्यसभेवर पाठवता येईल. काँग्रेसकडून कुमार केतकर यांची जागा खाली होत आहे. पण, कुमार केतकर यांना काँग्रेस परत पाठवणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे.
ADVERTISEMENT
कुमार केतकरांऐवजी काँग्रेस राज्यसभेवर कुणाला पाठवणार?
आता या जागेवर राज्यसभेवर कोणाला पाठवायचं हा प्रश्न आहे. काही नावांची चर्चा होत असली, तरी आरबीआयचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांच्या नावाभोवती चर्चा रंगली आहे. पण, अचानक रघुराम राजन यांच्या नावाची चर्चा का रंगली? हे समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रघुराम राजन यांच्या भेटीची वेळ बघावी लागेल.
हेही वाचा >> “शिवसेनाप्रमुखांच्या फोटो आणि खुर्चीची ठरवली 10 हजार किंमत ”, आमदाराची भावूक पोस्ट
राज्यसभेच्या निवडणुका लागताच रघुराम राजन यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे रश्मी ठाकरेंनी रघुराम राजन यांचं स्वागतही केलं. या भेटीचा फोटो आदित्य ठाकरेंनी इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला.
ठाकरे म्हणाले, “रघुराम राजन यांचं आरबीआयचे गव्हर्नर म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेतील योगदान मोठं आहे. भविष्यवेधी दृष्टी असलेल्या अशा तज्ज्ञांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दिली पाहिजे.”
सदिच्छा भेट की बेरजेचं राजकारण?
रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरेंची सदीच्छा भेट घेतली असं सांगण्यात आलं. पण, राजकारणात सदीच्छा भेटीतही राजकीय चर्चा होतात किंवा राजकीय दृष्टीकोणातूनच या भेटी होतात हे आपल्याला माहिती आहे.
अशाच सदीच्छा भेटीत पडद्यामागे अनेक गोष्टी घडून जातात हे आपण याआधीही पाहिलं आहे. रघुराम राजन आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळही महत्वाची आहे. देशात राज्यसभा निवडणुका घोषित झाल्या. अगदी याचवेळी रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आता कुठल्याही पक्षाची, कुठलीही व्यक्ती थेट मातोश्रीवर जाऊन भेट घेत असेल तर ती भेट राजकीय बोलणीसाठी असते.
हेही वाचा >> संभाजीराजेंनी ‘मविआ’ची लोकसभेसाठीची ‘ती’ ऑफर धुडकावली!
याआधीही आपण पाहिलं…प्रणव मुखर्जींना राष्ट्रपती व्हायचं होतं तेव्हा त्यांनी मातोश्रीवर येऊन भेट घेतली होती. इतकंच काय तर…शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा करण्यासाठी अमित शाह देखील थेट मातोश्रीवर जायचे…आता इंडिया आघाडीची चर्चा करण्यासाठीही के. सी. वेणूगोपाल असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा नितीश कुमार असतील यांनीही मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
आधी घडलेल्या या सगळ्या घटना बघता ऐन राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत रघुराम राजन यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची घेतलेली भेटीचे मोजके अर्थ लावले जाणार हे निश्चितच.
राहुल गांधींना मुलाखत, भारत जोडो यात्रेत सहभाग
रघुराम राजन यांची काँग्रेसमधून राजकीय एंट्री होऊन त्यांना महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा आहे. त्यासाठीच त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली असावी, असंही बोललं जातंय, पण आतापर्यंत कोणीही याबद्दल अधिकृत भाष्य केलेलं नाही.
रघुराम राजन यांची काँग्रेसमधूनच राजकीय एंट्री का होऊ शकते? हे समजून घेण्यासाठी आपल्याला काँग्रेस, राहुल गांधी आणि रघुराम राजन यांचे संबंध बघणं गरजेचे आहे. रघुराम राजन आरबीआयचे गर्व्हनर होते. त्यांची नियुक्ती २०१३ मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना झाली होती. २०१६ मध्ये त्यांची टर्म संपली.
हेही वाचा >> सुनील तटकरेंचा पत्ता होणार कट? भाजपचा रायगड लोकसभेसाठी प्लॅन काय?
आरबीआयच्या गर्व्हनर पदावरून मुक्त झाल्यानंतर रघुराम राजन अमेरिकेला गेले. तिथूनही ते अनेकदा मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांबद्दल बोलताना दिसले. त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणामधील उणिवाही अधोरेखित केल्या. राहुल गांधींनी ज्या नोटबंदीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर धरलं होतं, त्याच मुद्द्यावरून रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर रघुराम राजन अचानक राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत दिसले.
त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांची मुलाखत घेतली. यामध्ये देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा झाली. तेव्हापासून रघुराम राजन काँग्रेसमधून राजकीय एंट्री करतील अशी चर्चा होती. त्यानंतर दावोसमध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधींचं तोंडभरून कौतुक केलं होतं.
हेही वाचा >> भाजप 400 जागा जिंकू शकतं का? प्रशांत किशोरांची मोठी भविष्यवाणी
राहुल गांधी पप्पू असल्याची टीका भाजपचे नेते करतात. पण, यावरूनही रघुराम राजन यांनी भाजपवर टीका केली होती. राहुल गांधी पप्पू नसून स्मार्ट आहेत, असं ते म्हणाले होते. त्यानंतर रघुराम राजन तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासोबत दिसले होते. त्यामुळे रघुराम राजन यांची काँग्रेसमधूनच राजकीय एंट्री होईल अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
आता दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न रघुराम राजन यांना खरंच राजकारणात यायचं आहे का? तर याबद्दल त्यांनी लल्लनटॉपच्या मुलाखतीत भाष्य केलं होतं. राजकारणात फारसा रस नाही. पण, लोकशाहीच्या मार्गानं देश चालावा असं वाटतं आणि जो राजकीय पक्ष हे करायला तयार असेल त्यांच्यासोबत मी चर्चा करायला तयार आहे, असं रघुराम राजन म्हणाले होते.
त्यानंतर आता काँग्रेससोबत वाढलेली जवळीक बघता रघुराम राजन काँग्रेसमधून राजकीय एंट्री करतील असं बोललं जातंय. त्यासाठी राज्यसभा निवडणूक ही चांगली संधीसुद्धा त्यांच्याकडे आहे. आता काँग्रेस खरंच रघुराम राजन यांना राज्यसबेवर पाठवणार का? की लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना तिकीट देऊन लोकसभेत पाठवणार हे बघणं महत्वाचं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT