Women Reservation : पवारांवर ‘बाण’, सुप्रिया सुळेंना चिमटा; नवनीत राणांनी चढवला हल्ला
महिला आरक्षण विधेयकावर बोलताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सुप्रिया सुळे टोला लगावला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्री का केले नाही? असा सवालही केला.
ADVERTISEMENT

Navneet Rana speech Marathi : महिला आरक्षण विधेयकावर बोलताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी पवार कुटुंबावर बाण डागले. आधी सुप्रिया सुळेंना चिमटा काढला, तर नंतर उल्लेख न करता थेट शरद पवारांच नवनीत राणांनी सवाल केला. लोकसभेतील आपल्या भाषणात राणांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. (MP Navneet Rana Speech in Parliament on Women Reservation bill)
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा झाली. यावेळी नवनीत राणांनी विधेयकाला पाठिंबा दिला. राणांनी काही मुद्द्यांचा उल्लेख आपल्या भाषणात केला.
नवनीत राणा लोकसभेत काय बोलल्या?
खासदार नवनीत राणा म्हणाल्या, “आज सगळे चर्चा करताहेत की आरक्षण असायला हवे. आम्हा सगळ्या महिलांची इच्छा आहे. पण, ही गोष्टही खरी आहे की, आमच्यापेक्षाही जास्त पुरुषांचीही इच्छा आहे. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण पंतप्रधान मोदी आहेत. महिलांना समानतेची वागणूक दिली जावी, अशी त्यांची इच्छा आहे. केवळ भाषणातच महिलांच्या सन्मान केला जाऊ नये, तर त्यांच्या अधिकारासाठीही हे विधेयक संसदेत यायला हवं म्हणून पंतप्रधानांचे मी आभार मानते.”
सुप्रिया सुळेंना काढला चिमटा
याच विधेयकावर बोलताना सुप्रिया सुळेंनी वडील शरद पवारांच्या काही निर्णयाचा उल्लेख केला. यात शरद पवारांनी मुलगी असो वा मुलगा… एकच आपत्य जन्माला घालायचं असा निर्णय घेतल्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यावरून राणांनी चिमटा काढला.