उदयनराजेंची मागणी: प्रतापगडावरची अफझल खानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा

वाचा सविस्तर बातमी काय म्हटलं आहे उदयनराजेंनी?
Udayanraje's demand: Open Afzal Khan's tomb at Pratapgad for tourists
Udayanraje's demand: Open Afzal Khan's tomb at Pratapgad for tourists

प्रतापगडावरील अफजल खानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा.. भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कळला पाहिजे..मुस्लिम समाजाने गैरसमज करून घेऊ नये.. या गोष्टीला राजकीय स्वरूप देणं उचित नाही..अतिक्रमण काढून जे केलं ते योग्यच केलं असल्याचे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला कबर खुली करण्याचे आवाहन केलं आहे..

अफजल खानाच्या कबरीच्या शेजारचं काढलेलं अतिक्रमण हे योग्यच असून राज्य सरकारनं कायद्याचा आधार घेऊन केलेली कारवाई योग्यच असून या भूमिकेला समर्थन आहे. या कारवाईला राजकीय वळण देऊ नका असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

अफझल खानाची कबर पर्यटकांसाठी खुली करण्याची मागणी

प्रतापगडावरील अफजल खान कबर ही लोकांसाठी खुली केली पाहिजे असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले लोकांना आणि युवा पिढीला इतिहास कळावा यासाठी ही कबर लोकांना पाहण्यासाठी खुली केली पाहिजे. त्याचा राज्य सरकारनं विचार करावा असंही उदयनराजेंनी नमूद केले.

जगदंबा तलवार ब्रिटिश सरकारने परत केली पाहिजे

इंग्लंड येथील जगदंबा तलवार ही ऐतिहासिक ठेवा असून ब्रिटिश सरकारने मोठं मन दाखवून ती परत केली पाहिजे.. असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे..

प्रतापगडावर काय झालं?

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानच्या कबरीजवळील बांधकाम बुधवारी रात्रीपासूनच पाडण्यास सुरू केली. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली. परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं होतं.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचा हा सर्जिकल स्ट्राइक मानला जात आहे. शिवप्रताप दिनी हजारोंच्या संख्येने शिवभक्त महाबळेश्वर तालुक्यात दाखल झाले होते. मात्र आज पोलिसांनी कोणासही प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यास मनाई केली. किल्ल्याच्या परिसरात फिरल्यास त्यावर कडक कारवाई केली जात असल्याने परिसरात तणापूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in