‘बाळासाहेबांचे विचार पायदळी…’,PM मोदीच्या एकेरी उल्लेखानंतर CM शिंदे ठाकरेंवर बरसले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Eknath shinde criticize Uddhav Thackeray:
Eknath shinde criticize Uddhav Thackeray:
social share
google news

Eknath shinde criticize Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्य़ा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी पार पडलेल्या जळगावमधल्या पाचोरा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा एकेरी उल्लेख केला होता. या घटनेनंतर भाजप आणि शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा निषेध करत ही बाळासाहेबांची संस्कृती होऊ शकत नाही,अशी टीका केली आहे. (uddhav thackeray on single mention pm narendra modi eknath shinde criticize)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कालचे वक्तव्य हे वैयक्तिक देशातून आले होते. जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक द्वेषातून पछाडते आणि समोरच्या व्यक्तीची यशस्वीयता पोटदुखी निर्माण करते, त्यावेळेस अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचे पाप काही लोक करतात,अशी टीका मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे यांच्यावर केली. तसेच ज्यांनी 25 वर्ष युती म्हणून कामकाज केले त्यांच्याबाबत अशाप्रकारचे वक्तव्य करणे निंदाजनक आहे. ही बाळासाहेबांची संस्कृती होऊ शकत नाही. बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार? हे काल सिद्ध करून दाखवलं, अशी टीका देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

हे ही वाचा : ‘उद्धवजी तुमची गत….’, पंतप्रधान मोदींच्या एकेरी उल्लेखानंतर बावनकुळे संतापले

पंतप्रधान मोदींबाबत एकेरी उल्लेख करणाऱ्यांची जेवढी निंदा आणि निषेध करावा तेवढा कमी आहे.देशाचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं नेतृत्व देशात नाही तर जगात सिद्ध केले आहे. देशाची अर्थव्यवस्था इतक्या उंचावर नेण्याचे काम त्यांनी केले आहे.ज्यामुळे जी20 चे अध्यक्षपद आपल्याला मिळालंय,असे देखील शिंदे (Eknath Shinde)म्हणाले आहेत. मोंदींबद्दल प्रत्येकालाच गर्व आणि अभिमान आहे. संपूर्ण देशातली जी दीडसशे कोटी जनता आहे ती त्यांचा परीवार आहे. स्वत:च्या कुटूंबाप्रमाणे ते जनतेला आपले मानतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

जळगावच्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते की, माझ्यावर आरोप करतात की मी घरी बसून सरकार चालवलं. पण मी घरी बसून ज केलं ते तुम्ही वणवण फिरून करू शकला नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळत होतो म्हणून ही जनता इथे आली आहे. पुढे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घऱाणेशाहीवर बोलताना मोदींवर टीका केली. घराणेशाहीला एक परंपरा असते.तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये,कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं? ते म्हणताता ना, मी फकीर आहे,मग झोळी लटकवून निघून जाशील,पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं,असा एकेरी उल्लेख करत त्यांनी टीका केली होती. या टीकेनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.

हे ही वाचा : ‘तीन महिन्यात चौकशी करा’,’दोषी आढळलो तर….’,गुलाबराव पाटलांच राऊतांना आव्हान

    follow whatsapp

    ADVERTISEMENT