फॉक्सकॉन गुजरातला गेल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

मुंबई तक

सध्या महाराष्ट्रात फॉक्सकॉनवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रोज रंगताना दिसत आहेत. याबाबत महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे नेते सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारला प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी दोषी धरत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही महाविकास आघाडीमुळेच प्रकल्प गुजरातला गेल्याचं म्हणत आहेत. याच संदर्भात उद्धव ठाकरेंची पहिली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सध्या महाराष्ट्रात फॉक्सकॉनवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रोज रंगताना दिसत आहेत. याबाबत महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे नेते सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारला प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी दोषी धरत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही महाविकास आघाडीमुळेच प्रकल्प गुजरातला गेल्याचं म्हणत आहेत. याच संदर्भात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी?

फॉक्सकॉन हा प्रकल्प दोन महिन्यात गुजरातला गेलाच कसा? गुजरात राज्य महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. त्यांच्याकडे हा प्रकल्प गेला पण त्यावेळी राज्य सरकार काय करत होतं? वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले होते. आत्ताचे सत्ताधारी प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल आम्हाला दोष देत आहेत. मात्र त्यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मोदींना काय अधिकार?; ‘वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट’वरून पृथ्वीराज चव्हाण संतापले

शिवसेनेच्या मुंबईतल्या विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांची बैठक मुंबईत पार पडली. यामध्ये दसरा मेळाव्यासंदर्भातही उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून दसरा मेळावा हायजॅक होण्याची शक्यता आहे. अशात दसरा मेळाव्यासाठी तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी आजच्या बैठकीत दिले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp