‘निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा घडवलं?’, सत्यपाल मलिकांच्या खळबळजनक आरोपानंतर राऊतांचा हल्लाबोल

योगेश पांडे

Satyapal Malik sensational accusation: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनीही मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

ADVERTISEMENT

pulwama attack satyapal malik sensational accusation sanjay raut
pulwama attack satyapal malik sensational accusation sanjay raut
social share
google news

नागपूर: ‘ज्या दिवशी पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला (Pulwama attack) झाला त्याच दिवशी संध्याकाळी पंतप्रधान मोदींना (PM Modi) फोन केला आणि सांगितलं की पुलवामा हे आपल्या सरकारच्या चुकीमुळे घडलं आहे. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं, तर हे घडलं नसतं. पण त्यावेळी पंतप्रधान मोदींनी मला सांगितलं की, आत्ता तुम्ही शांत राहा.’ असा गंभीर आरोप जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केल्यानंतर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करत गंभीर आरोपही केले आहेत. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (was pulwama staged to win elections sanjay raut attack after satyapal malik sensational accusation)

‘सुरक्षा जवानांची पुलवामामध्ये हत्या करावी आणि नंतर त्याचं राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात अशी काही योजना होती का? भाजपनेच नेमलेले तेव्हाचे राज्यपाल सत्यपाल यांनी तेच सत्य समोर आणलं.. स्फोटक सत्य समोर आणलंय आणि ते पुलवामाच्या स्फोटापेक्षा भयंकर आहे.’ असं म्हणत संजय राऊत यांनी पुलवामा हल्ल्याबाबत मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

पाहा पुलवामा हल्ल्याबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

‘ही गोष्ट देशाला आधीच माहित होती की, पुलवामा हल्ल्यात काही तरी गडबड आणि घोटाळा आहे. यामध्ये तेव्हाचे सत्ताधारी जे 2019 ला सामोरे जात होते. आता जे सत्तेवर आहेत. त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी ते काही तरी गडबड करतील अशाप्रकारची.. भारत-पाकिस्तान, हल्ला वैगरे.. हे प्रश्न आम्ही वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला की, किती किलो आरडीएक्स गेलं.. पुलवामामध्ये आरडीएक्स पोहचलं कसं? इतका कडेकोट बंदोबस्त असताना आरडीएक्स पोहचलं कसं?’

हे देखील वाचा- “देशात तेवढेच करायचे बाकी”, उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पुन्हा डिवचलं

‘पुलवामाच्या रस्त्यांवरून सुरक्षाकर्मी कधीही प्रवास करत नाहीत. त्यांना एअरफोर्सने किंवा सरकारने विमान का दिलं नाही? की, त्यांची पुलवामामध्ये हत्या करावी आणि नंतर त्याचं राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात अशी काही योजना होती का?’

हे वाचलं का?

    follow whatsapp