FIFA World Cup : विजेता कोणीही होवो, नकली ट्रॉफीच घरी घेऊन जावी लागणार!
कतारमधील दोहा येथील लुसेल स्टेडियमवर रविवारी मध्यरात्री फुटबॉल विश्वाला नवीन चॅम्पियन मिळणार आहे. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज (18 डिसेंबर) फ्रान्स-अर्जेंटिना हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. फ्रान्सने मोरोक्कोवर तर अर्जेंटिनाने क्रोएशियावर मात करून विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. ट्रॉफीची रंजक कहाणी : […]
ADVERTISEMENT

कतारमधील दोहा येथील लुसेल स्टेडियमवर रविवारी मध्यरात्री फुटबॉल विश्वाला नवीन चॅम्पियन मिळणार आहे. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज (18 डिसेंबर) फ्रान्स-अर्जेंटिना हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. फ्रान्सने मोरोक्कोवर तर अर्जेंटिनाने क्रोएशियावर मात करून विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
ट्रॉफीची रंजक कहाणी :
या अंतिम सामन्यानंतर विजेत्या संघाला देण्यात येणार्या ट्रॉफीची कहाणी काहीशी रंजक आहे. नियमाप्रमाणे, अंतिम सामन्यातील विजेत्या संघाला सामना जिंकल्यानंतर फिफाची मूळ ट्रॉफी केवळ जल्लोष करतानाच देण्यात येते. पुरस्कार सोहळ्यानंतर फिफाचे अधिकारी विजेत्या संघाकडून मूळ ट्रॉफी परत घेतात.
त्याऐवजी विजेत्या संघाला मूळ ट्रॉफीची प्रतिकृती, हुबेहुब दिसणारी ब्राँझची आणि सोन्याचा थर असलेली दुसरी ट्रॉफी देण्यात येते. फिफा विश्वचषकाची मूळ ट्रॉफी झुरिच येथील मुख्यालयातच राहते. ही ट्रॉफी केवळ फिफा वर्ल्डकप दरम्यानच जगासमोर आणली जाते. याचाच अर्थ फ्रान्स/अर्जेंटिना संघाला मूळ ट्रॉफी घरी नेता येणार नाही.
1930 मध्ये पहिल्यांदा फुटबॉल वर्ल्ड कपला सुरुवात झाली. त्यावेळी विजेत्या संघाला देण्यात येत असलेल्या ट्रॉफीचं ज्युल्स रिमेट ट्रॉफी असं नाव होतं. ही ट्रॉफी 1970 पर्यंत चॅम्पियन संघांना देण्यात येत होती. त्यानंतर विश्वचषकच्या ट्रॉफीची पुनर्रचना करण्यात आली. या नवीन ट्रॉफीच्या डिझाइनचं काम इटालियन कलाकार सिल्व्हियो गजानिया यांना देण्यात आलं होतं. ही ट्रॉफी 1974 च्या हंगामापासून देण्यास सुरुवात झाली. याच ट्रॉफीला फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी म्हटलं जातं. मात्र 2005 मध्ये, फिफाने नियमात बदल करुन विजेत्या संघाला मूळ ट्रॉफी घरी नेता येणार नाही, अशी तरतूद केली.