पाकिस्तानचे असद रौफ याचं निधन; स्पॉट फिक्सिंग, भारताचा बॅन ते मॉडेलच्या आरोपांमुळे राहिले चर्चेत

पाकिस्तानचे उत्कृष्ट अंपायर्स एक असद रौफ यांचे बुधवारी लाहोरमध्ये निधन झाले.
पाकिस्तानचे असद रौफ याचं निधन; स्पॉट फिक्सिंग, भारताचा बॅन ते मॉडेलच्या आरोपांमुळे राहिले चर्चेत

पाकिस्तानचे उत्कृष्ट अंपायर्स एक असद रौफ यांचे बुधवारी लाहोरमध्ये निधन झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट असलेले असद रौफ 66 वर्षांचे होते. असद रौफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. असद रौफ यांनी त्यांच्या 13 वर्षांच्या कारकिर्दीत 49 कसोटी, 98 एकदिवसीय आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यांच्यावर 2013 च्या आयपीएल हंगामात स्पॉट फिक्सिंगचा आरोप होता. त्यानंतर 2016 मध्ये बीसीसीआयने असद रौफ यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली होती.

असद रौफ दुकान बंद करुन जात असताना काळाचा घाला

बंदीनंतर असद रौफ यांचे आयुष्य खूप बदलले होते. ते लाहोरमधील एका बाजारात चपला-कपड्यांचे दुकान चालवत असे. असद यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा भाऊ ताहिर रौफ याने दिली आहे. ताहिरने सांगितले की, असद बुधवारी दुकान बंद करून घरी परतत असताना त्याच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

मॉडेलने केले होते गंभीर आरोप

रौफ 2012 मध्ये मुंबईतील एका मॉडेलने लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे देखील चर्चेत आले होते. मॉडेलने दावा केला की तिचे पाकिस्तानी अंपायरशी अफेअर होते कारण त्याने लग्न करण्याचे वचन दिले होते. मात्र नंतर रौफने वचन तोडले.

बीसीसीआयने बंदी घातली होती

2013 मध्ये असद रौफ यांच्या कारकिर्दीवर परिणाम झाला. पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली होती, पण असद यांनी अंपायरिंग सुरूच ठेवले होते. 2013 मध्ये असद यांच्यावर आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर असद यांना मध्येच आयपीएल सोडावी लागली. तसेच, त्याच वर्षी त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमधून काढून टाकण्यात आले आणि त्यांना आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय अंपायरिंग पॅनेलमधूनही वगळण्यात आले.

या सर्व गोष्टींमुळे असद यांनी अंपायरिंगमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर 2016 मध्ये बीसीसीआयने असद रौफवर पाच वर्षांची बंदी घातली होती. त्यानंतर शिस्तपालन समितीने त्यांना भ्रष्टाचारात दोषी ठरवले. रौफ यांनी सट्टेबाजांकडून मौल्यवान भेटवस्तू स्वीकारल्या होत्या आणि 2013 च्या आयपीएल दरम्यान मॅच फिक्सिंग प्रकरणातही त्यांचा सहभाग होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in