वयाच्या घोळामुळे शाहीद आफ्रिदी पुन्हा चर्चेत
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करुन बरीच वर्ष उलटली. परंतू वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आफ्रिदी अजुनही टी-२० लिगमध्ये खेळत आहे. १ मार्च हा शाहिद आफ्रिदीचा वाढदिवस असतो. या दिवशी आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केलंय, ज्यात त्याने आपलं वय हे ४४ वर्ष असल्याचं म्हटलं आहे. आफ्रिदीच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्याच्या वयावरुन […]
ADVERTISEMENT

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करुन बरीच वर्ष उलटली. परंतू वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आफ्रिदी अजुनही टी-२० लिगमध्ये खेळत आहे. १ मार्च हा शाहिद आफ्रिदीचा वाढदिवस असतो. या दिवशी आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केलंय, ज्यात त्याने आपलं वय हे ४४ वर्ष असल्याचं म्हटलं आहे. आफ्रिदीच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्याच्या वयावरुन पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
Thank you very much for all the lovely birthday wishes – 44 today! My family and my fans are my biggest assets. Really enjoying my stint with Multan and hope to produce match winning performances for all MS fans.
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) February 28, 2021
आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात आपलं वय हे ४६ वर्ष असं लिहीलं आहे. तर क्रिकेटचे सामने कव्हर करणाऱ्या काही वेबसाईटवर आफ्रिदीचं वय हे ४०-४१ वर्ष दाखवलं जातंय. त्यामुळे आफ्रिदीचं वय नेमकं आहे तरी किती यावरुन सोशल मीडियावर फॅन्स त्याला पुन्हा एकदा ट्रोल करत आहेत.
गेम चेंजर या आपल्या आत्मचरित्रात शाहिद आफ्रिदीने आपल्या वयाबद्दलचा खुलासा केला आहे. यात आफ्रिदीने असं म्हटलंय की कागदपत्रात दाखवलेल्या वयापेक्षा आपलं वय हे अधिक आहे. दोन्ही तारखांमध्ये ५ वर्षांचा फरक असल्याचंही आफ्रिदी म्हणाला होता. आफ्रिदीच्या या खुलाश्यानंतर वादही झाला होता.