IPL 2024 : हर्षल पटेलसाठीही लागली रेकॉर्डब्रेक बोली, पंजाब किंग्सने मोजले अव्वाच्या सव्वा…

ADVERTISEMENT

harshal patel has been bought by punjab kings for 11.75 crore ipl auction
harshal patel has been bought by punjab kings for 11.75 crore ipl auction
social share
google news

IPL Auction 2024: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी मिनी लिलाव दुबईतील कोका-कोला एरिना येथे झाला. या मिनी लिलावात 332 खेळाडूंची बोली लागली त्यातील 216 भारतीय खेळाडू होते. या 332 खेळाडूंच्या यादीत 113 कॅप्ड, 217 अनकॅप्ड आणि 2 असोसिएट खेळाडूंचा समावेश आहे. एकूण 116 परदेशी खेळाडूंचा लिलावा झाला तर त्यामध्ये इंग्लंडचे सर्वाधिक 24 क्रिकेटपटू होते. आयपीएलच्या या मिनी ऑक्शनमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलही (Harshal Patel) दिसून आला. या लिलावामध्ये हर्षल पटेलला पंजाब किंग्सने (PBKS) 11.75कोटी रुपयांना विकत घेतले आहे. या मिनी लिलावात हर्षल हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला होता. याआधी हर्षल हा आयपीएलच्या शेवटच्या हंगामामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचाच एक भाग होता.

पटेलसाठी पहिली बोली

लिलावावेळी गुजरात टायटन्सकडून (GT) हर्षल पटेलसाठी पहिली बोली लावली. त्यानंतर पंजाब किंग्स (PBKS) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) देखील हर्षलला खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील होते. लखनऊ सुपर जायंट्सकडे केवळ 13.75 कोटी रुपये होते, त्यामुळे ते पंजाब किंग्जला थेट आव्हान देऊ शकले नाहीत. या परिस्थितीत पंजाबने लखनऊ आणि गुजरातला मागे टाकत हर्षलला आपल्या ताफ्यात त्यांनी सामील करून घेतले. तर दुसरीकडे आरसीबीने हर्षलसाठी अजिबात रस दाखवला नाही.

हे ही वाचा >> Dawood भारतातून फरार झाला ‘त्या’ रात्रीची कहाणी, मंत्रालयात ‘त्या’ नेत्याला फोन अन्…

सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम

हर्षल पटेल हा टी-20 क्रिकेटमधील निष्णात गोलंदाज म्हणून ओळखला जातो. आयपीएल 2021 मध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने पर्पल कॅप (32 विकेट) मिळवली होती. त्या काळात त्याने एका सिझनमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत ड्वेन ब्राव्होच्या विक्रमाचीही बरोबरी केली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

घेतले होते 29 बळी

33 वर्षाच्या हर्षलने 2021 साली न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामधून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2022 च्या T20 विश्वचषकासाठी तो भारतीय संघाचाही एक महत्वाचा भाग होता. हर्षल पटेलने आतापर्यंत 25 टी-20 सामन्यात 26.55 च्या सरासरीने 29 बळी घेतले आहेत. या काळात हर्षल पटेलचा इकॉनॉमी रेट 9.18 राहिला आहे.

हर्षलची सर्वोत्तम गोलंदाजी

हर्षल पटेलने आयपीएलमध्ये 91 सामन्यात 24.07 च्या सरासरीने 111 विकेट घेतल्या आहेत. तर याच काळामध्ये त्याने एकदा 5 विकेट्स आणि दोन वेळा चार बळी घेतले होते. हर्षलची आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 27 धावांमध्ये 5 बळी घेतले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mitchell Starc आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू! KKR ने किती कोटीला केले खरेदी?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT