Ind vs Wi: वेस्ट इंडिजने भारताला हरवले, हार्दिक पंड्या म्हणतो,’कधी कधी…’
पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत दुबळ्या वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 3-2 ने पराभव केला आहे. हा पराभव टीम इंडियाच्या फॅन्सच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कारण जो संघ वनडे वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय होऊ शकला नाही, त्या संघाविरूद्द टीम इंडियाचा पराभव ही खुप मोठी बाब आहे.
ADVERTISEMENT
पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत दुबळ्या वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 3-2 ने पराभव केला आहे. हा पराभव टीम इंडियाच्या फॅन्सच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कारण जो संघ वनडे वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय होऊ शकला नाही, त्या संघाविरूद्द टीम इंडियाचा पराभव ही खुप मोठी बाब आहे. या पराभवानंतर हार्दिक पंड्याच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याचसोबत पराभवानंतर हार्दिक पंड्याने आता मोठं विधान केले आहे. या विधानावरून आता त्याला ट्रोल करण्यात येत आहे. (ind vs wi team india loss t20 series hardik pandya statement after losing series)
वेस्ट इंडिज विरूद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाचा 3-2 ने पराभव झाला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ही पहिली टी20 मालिका गमावली आहे. या पराभवानंतर हार्दिक पंड्याने ‘कधी कधी पराभव चांगला असतो’, या पराभवामुळे तुम्हाला खुप काही शिकायला मिळते, असे विधान केले होते. या त्याच्या विधानावरून आता त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहेत. यासोबतच हार्दिक पंड्या हे विधान करण्या इतपतं मोठा खेळाडू किंवा कर्णधार बनला आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
हे ही वाचा : Ind vs WI :सूर्यकुमार यादव चमकला!खणखणीत अर्धशतकाच्या बळावर WI समोर इतक्या धांवाचे आव्हान
कसा रंगला सामना
पाचव्या टी20 सामन्यापूर्वी दोन्हीही संघ 2-2 ने मालिकेत बरोबरीत होते. पाचवा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा होता. या सामन्यात हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. मात्र हवी तशी सुरूवात टीम इंडियाला करता आली नाही. आणि सुर्यकूमार यादवच्या एकट्याच्या 61 धावांच्या बळावर टीम इंडियाने 9 विकेट गमावून 165 धावा केल्या होत्या. त्यामुळे वेस्ट इंडिजसमोर 166 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या वेस्ट इंडिजने 2 विकेट गमावून 171 धावा केल्या. यामुळे वेस्ट इंडिजने 8 विकेट आणि 12 बॉल राखून टीम इंडियावर मोठा विजय मिळवत 3-2 ने मालिका खिशात घातली. वेस्ट इंडिजच्या ब्रॅंडन किंगने 85 धावांची खेळी केली, आणि तो या विजयाचा शिल्पकार ठरला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हार्दिक पंड्या काय म्हणाला?
वेस्ट इंडिजविरूद्ध पराभवानंतर हार्दिक पंड्या म्हणाला की, ‘मी जेव्हा क्रीजवर आलो तेव्हा आम्ही आमची लय गमावली आणि परिस्थितीचा फायदा घेता आला नाही. हे सर्व सामने असे होते ज्यातून तुम्हाला शिकायला मिळते, असे हार्दिक पंडया म्हणाला आहे. कधी-कधी पराभव चांगला असतो. या पराभवानंतर तुम्हाला खूप काही शिकायला मिळते. सर्वच खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आहे. जिंकणे आणि हरणे हा एक प्रक्रियेचा भाग आहे. यातून आम्ही शिकत आहोत, याची आम्हाला खात्री आहे, असे देखील हार्दिक पंड्या म्हणाला आहे.
हे ही वाचा : World Cup 2023: अवघे काही दिवसच शिल्लक, टीम इंडियासमोर आव्हानांचा डोंगर?
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात संघाचा परफॉर्मन्स
हार्दिक पंड्याने 15 टी20 सामन्यात कर्णधारपद सांभाळले आहे. ज्यामध्ये टीम इंडियाने 10 सामने जिंकले आहेत. तर 5 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. हार्दिकने 3 वनडे सामन्यांचे नेतृत्व केले होते. यामध्ये 2 सामन्यात टीम इंडिया जिंकली आहे, तर एका सामन्यात पराभव झाला आहे. दरम्यान हार्दिकला भविष्यातला टीम इंडियाचा कर्णधार मधून पाहिले जात आहे, यासाठी त्याच्यावर कर्णधार पदाची जबाबदारी दिली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT