IND vs SL : मोहम्मद सिराजने हॅटट्रिकसाठी बॉल फेकला अन्…, कोहली-गिलने घेतली मजा!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Asia Cup 2023 : आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये कोलंबोच्या मैदानावर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेची फलंदाजी पहिल्या चार षटकांत म्हणजे 24 बॉलमध्ये उद्ध्वस्त केली. यादरम्यान सिराजने दोन षटकांत म्हणजे 12 बॉलमध्ये चार बळी घेतले. तसंच चार स्लिप्स ठेवण्यासह त्याला गोलंदाजीनंतर ब्राउंड्रीकडेही धाव घ्यावी लागली, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोहम्मद सिराजने केला कहरच!

टीम इंडियासाठी पहिले षटक आणणाऱ्या बुमराहने तिसऱ्याच चेंडूवर सलामीवीर कुसल परेराला शून्यावर बाद केले. यानंतर सिराजने दुसऱ्या षटकात उत्कृष्ट गोलंदाजी करत मेडन षटक टाकलं. तिसर्‍या षटकात बुमराहने एक धाव केली आणि चौथ्या षटकात सिराजने 6 चेंडूत श्रीलंकेच्या चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या काळात सिराजने चौथ्या षटकात पथुम निसांका (दोन धावा), सदिरा समरविक्रमा (शून्य), चरित असलंका (शून्य) आणि शेवटी धनंजया दा सिल्वा (4 धावा) यांना चौथ्या षटकात चार झटके दिले. त्यामुळे श्रीलंकेने 12 धावांवर 5 विकेट गमावल्या.

तुम्हाला नेहमीच जाणवतो थकवा, मग लगेच ‘या’ गोष्टी खाणं बंद करा

मात्र, सिराज इथेच थांबला नाही आणि आपल्या स्पेलच्या तिसर्‍या षटकात आणि डावाच्या सहाव्या षटकात त्याने कर्णधार दासून शनाकाला (0) क्लीन बोल्ड केले आणि चार धावांत 5 बळी घेतले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सिराजच्या पळण्यावर कोहली-गिलला आलं हसू…

आपल्या भन्नाट गोलंदाजीदरम्यान, सिराज डावाच्या चौथ्या षटकात हॅट्रिकवर होता आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर चौथ्या बॉलवर तो एकटाच ब्राउंड्री लाइनकडे धावताना दिसला. सिराजच्या चौथ्या बॉलवर मिड-ऑनच्या दिशेने चार स्लिपमधून गॅप शोधत धनंजयने शॉट मारला. गोलंदाजी करणारा सिराज कोणीही फिल्डर नसल्याचं पाहून, एकटाच बॉल पकडण्यासाठी बाउंड्रीकडे धावला. सिराजला धावताना पाहून स्लिपमध्ये उभे असलेले विराट कोहली आणि शुभमन गिलला हसू आवरता आलं नाही. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : W,O,W,W,4,W…फायनल सामन्यात मोहम्मद सिराजची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

सामन्याबद्दल बोलायचे झालं तर, सिराजच्या 5 विकेट आणि बुमराहच्या एका विकेटमुळे श्रीलंकेचे सहा फलंदाज 8 षटकात 16 धावांवर पॅव्हेलियनमध्ये गेले. आता अंतिम सामन्यात टीम इंडिया पूर्णपणे वरचढ दिसत आहे. दुसरीकडे, आधीच्या फलंदाजांच्या जोरावर श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठायची आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT