World Cup 2027 : पुढचा विश्वचषक होणार खास! कधी, कुठे अन् किती असणार टीम… जाणून घ्या

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

next world cup cricket 2027 place : South Africa and Zimbabwe will be joint hosts for the second time after the 2003 World Cup. Whereas Namibia will host the World Cup for the first time.
next world cup cricket 2027 place : South Africa and Zimbabwe will be joint hosts for the second time after the 2003 World Cup. Whereas Namibia will host the World Cup for the first time.
social share
google news

World cup 2027 Host Country : क्रिकेट विश्वाला नवा जगज्जेता मिळाला. ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत विश्वचषक २०२३ वर नाव कोरले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं, पण भारताचं तिसऱ्यांदा ज्जेता होण्याचं स्वप्न मात्र धुळीस मिळालं. त्यामुळे विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी भारताला चार वर्षे प्रतिक्षा करावी लागणार आहे. पुढची विश्वचषक स्पर्धा ही तीन देशात खेळवली जाणार आहे. (ICC Cricket World Cup 2027 schedule)

ADVERTISEMENT

कुठे होणार विश्वचषक 2027?

विश्वचषक जिंकण्याची भारताची प्रतीक्षा पुन्हा एकदा वाढली आहे. आता चार वर्षांनंतर भारतीय संघ वनडे वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी मैदानात उतरेल. पुढील विश्वचषक 2027 मध्ये खेळवला जाणार आहे. तीन देश 2027 विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करणार आहेत. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे देश १४व्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहेत.

हे ही वाचा >> Ind vs Aus : टीम इंडिया खचली, PM मोदी गेले थेट ड्रेसिंगमध्ये; मॅचनंतर काय घडलं?

दुसऱ्यांदा यजमानपद

2003 च्या विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे विश्वचषक स्पर्धेचे दुसऱ्यांदा संयुक्त यजमान असतील. तर नामिबिया प्रथमच विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. विश्वचषक 2027 मध्ये संघांची संख्याही अधिक असणार आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> ‘खरं सांगायचं तर…’, रोहितने सांगितल्या चुका, कुणाला ठरवलं जबाबदार?

भारतात झालेल्या विश्वचषकात 10 संघ सहभागी झाले होते, तर आता पुढील विश्वचषकात संघांची संख्या 14 होणार असून, एकूण 54 सामने खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. आयसीसी क्रमवारीत पहिल्या आठ संघ विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र क्वालिफाय होतील. तर इतर चार टीम निवडीसाठी क्वालिफाय स्पर्धा होणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अशी होणार स्पर्धा….

2027 च्या विश्वचषक स्पर्धेत एकूण 14 संघ खेळणार आहेत. दोन गट केले जाणार आहेत. प्रत्येकी सात संघ एक गटात असणार आहे. प्रत्येक गटात पहिल्या तीन संघ सुपर सिक्स साठी पात्र ठरतील. त्यानंतर सेमी फायनल आणि फायनल सामना खेळवला जाणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT