Neeraj Chopra: 'गोल्डन बॉय'कडून कसं हुकलं सुवर्ण पदक? म्हणाला...
Neeraj Chopra reaction on silver Medal : नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. भालाफेकमध्ये त्याने 89.45 मीटरचा जबरदस्त थ्रो केला. आता नीरजने त्याच्या या अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे.
'तो' अर्शद नदीमचा दिवस होता- अर्शद नदीम
'गोल्डन बॉय'कडून कसं हुकलं सुवर्ण पदक?
Neeraj Chopra reaction on silver Medal : नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. भालाफेकमध्ये त्याने 89.45 मीटरचा जबरदस्त थ्रो केला. आता नीरजने त्याच्या या अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे. त्याने सांगितले की, त्याचा हा थ्रो चांगला होता पण दुखापतीमुळे तो अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही. नीरज म्हणाला, 'तो दिवस अर्शद नदीमचा होता, आपल्याला हे मान्य करावे लागेल.' (paris olympic 2024 javelin throw neeraj chopra reaction on silver medal pakistani athlete arshad nadeem won golden medal)
ADVERTISEMENT
या ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले रौप्य पदक आहे. नीरजची स्पर्धा पाकिस्तानच्या अर्शद नदीमशी होती. नदीमने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने 92.97 मीटर भालाफेक करून पाकिस्तानसाठी ऑलिम्पिक विक्रम रचला. नीरज चोप्राला विचारण्यात आले की, जेव्हा अर्शदने ऑलिम्पिक विक्रम केला तेव्हा त्याच्या मनात काय चाललं होतं? यावर तो म्हणाला, "आजचा तो दिवस होता, आणि त्याची गरजही होती. पण ही गोष्ट मनाला लागली की, यार आज नाही तर मग कधी? म्हणजे मी याचा कधी विचारच केला नाही. पण आज ही गोष्ट माझ्या मनात आली. मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केले, परंतु काही दुखापतीमुळे मी ते उघडपणे थ्रो करू शकलो नाही. शरीरही पाहिजे तसं फिट नव्हतं. तरीही, मी या 'थ्रो'ने आनंदी आहे."
हेही वाचा : Neeraj Chopra: 'खेल अभी बाकी है!' भारताच्या खात्यात 'रौप्य'; भालाफेकीत नीरज चोप्राचा मोठा पराक्रम!
'तो' अर्शद नदीमचा दिवस होता- अर्शद नदीम
नीरज चोप्रा पुढे म्हणाला, "जेव्हा अर्शदने थ्रो केला, दुसऱ्या थ्रोमध्ये, माझ्या मनात एकच गोष्ट होती... जरी मी आत्तापर्यंत 90 मीटर क्रॉस केले नाही आहे, परंतु माझ्या मनात होते की मी आज ते करेन पण तसं घडलं नाही. आता कधी होतंय ते बघूयात. पण स्पर्धा छान होती, त्यामुळे मी आनंदी आहे."
हे वाचलं का?
बहुतेक खेळांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना असतो तेव्हा वातावरण वेगळे असते. यावरही नीरजने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, "मी माझ्या देशवासीयांना सांगू इच्छितो की हे पहिल्यांदाच घडले आहे. मी अर्शदसोबत 2016 पासून खेळत आहे. देवाने मला नेहमीच साथ दिली आहे. आज पहिल्यांदाच अर्शद जिंकला आहे. मी सुरुवात केली तेव्हा आधी हरलो पण नंतर हळूहळू विजय मिळवला."
हेही वाचा : MHADA Lottery 2024: उरले फक्त काही तास! मुंबईतील घराचं स्वप्न होणार साकार; असा करा अर्ज
नीरज चोप्रा हा एक उत्कृष्ट भारतीय खेळाडू मानला जातो. यावर तो म्हणाला, “माझ्या नजरेत अजून खूप काही बाकी आहे आणि ते जेव्हा पूर्ण होईल आणि जोपर्यंत माझे शरीर मला साथ देईल, तोपर्यंत मी कठोर परिश्रम करत राहीन. मी देशाला शक्य तितक्या उंचावर नेईन."
ADVERTISEMENT
नीरजचे 'रौप्य' यश! आई नेमकं काय म्हणाली?
अर्शद नदीमच्या विजयावर नीरज चोप्राच्या आईचे वक्तव्य व्हायरल झाले आहे. नीरजची आई सरोज देवी म्हणाल्या की, 'तिच्यासाठी रौप्य पदकही सुवर्णासारखे आहे. ज्या मुलाला (अर्शद नदीम) सुवर्णपदक मिळाले आहे तोही आमचाच मुलगा आहे. तो ही खूप मेहनत करतो.'
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT