इंग्लिश टेस्टसाठी विराट सज्ज, नेट्समध्ये करतोय जोरदार सराव
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभवाचं पाणी पाजल्यानंतर टीम इंडिया आता घरच्या मैदानावर इंग्लंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. ५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात टेस्ट मॅच सिरीजला सुरुवात होणार आहे. चेन्नईच्या मैदानावर पहिल्या दोन टेस्ट मॅच खेळवल्या जातील. बाळाच्या जन्मासाठी सुट्टीवर गेलेला विराट कोहली टीम इंडियात परतला असून त्याने जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. विराटने आपल्या […]
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभवाचं पाणी पाजल्यानंतर टीम इंडिया आता घरच्या मैदानावर इंग्लंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. ५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात टेस्ट मॅच सिरीजला सुरुवात होणार आहे. चेन्नईच्या मैदानावर पहिल्या दोन टेस्ट मॅच खेळवल्या जातील. बाळाच्या जन्मासाठी सुट्टीवर गेलेला विराट कोहली टीम इंडियात परतला असून त्याने जोरदार सरावाला सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेट्समध्ये सरावाचा एक फोटो पोस्ट करत Keep your head down and Keep Working अशी कॅप्शन विराटने आपल्या फोटोला दिली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला विराटच्या नेतृत्वाखाली एडिलेड टेस्ट मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यानंतर टीम इंडियाने धडाकेबाज कमबॅक करत मालिकेत बाजी मारली. त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थितीतही टीम इंडिया जिंकू शकते हे ऑस्ट्रेलियात सिद्ध झालं आहे. अशा परिस्थितीत इंग्लंड दौऱ्यात स्वतःला सिद्ध करण्याची मोठी जबाबदारी विराट कोहलीवर असणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT