yuvraj singh arrest : क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक व जामीन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय संघातील माजी धडाकेबाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक युवराज सिंगला हरयाणातील हिसार जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. फिरकीपटू यजुवेंद्र चहल यांच्याबद्दल केलेल्या जातीवाचक उल्लेखाप्रकरणी युवराज अटक करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने युवराज सिंगची जामीनावर मुक्तता केली.

दलित हक्क कार्यकर्ते रजत कलासन यांनी क्रिकेटपटू युवराज सिंगविरुद्ध एससी-एसटी अॅक्ट अर्थात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत युवराज सिंगला हरयाणातील हिसार जिल्ह्यात अटक केली. उच्च न्यायालयाने युवराज सिंगला जामीन मंजूर केला असून, त्याला सोडण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या युवराज सिंग गेल्या वर्षी वादात सापडला होता. यजुवेंद्र चहलबद्दल युवराजने विधान केलं होतं. जे जातीवाचक असल्याचं सांगत आक्षेप घेण्यात आला होता. गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये युवराज सिंगने रोहित शर्मासोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅटवर गप्पा मारत असताना यजुवेंद्र चहलबद्दल टिप्पणी केली होती. त्याचं हे विधान जातीवाचक असल्याचा सांगत माफीची मागणी केली गेली होती. गेल्या वर्षी यावरून #युवराज_सिंग_माफी_मागो हा हॅशटॅगही ट्रेंड झाला होता.

या प्रकरणाबद्दल युवराज सिंगने माफी मागितली होती. युवराजने सोशल मीडिया हॅण्डलवर एक पोस्ट शेअर केली होती. ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की, मी कधीही जात, रंग, वर्ण आणि लिंग या आधारावरील कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास ठेवत नाही. मी माझं आयुष्य लोकांच्या चांगल्यासाठी खर्च केलं आहे. आजही हेच करत असून, मी कोणताही अपवाद न ठेवता सगळ्यांच्या आयुष्याचं सन्मान करण्यात विश्वास ठेवतो’, असं युवराजने म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

‘मी माझ्या मित्राशी बोलत होतो. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. जो पूर्णपणे निराधार आहे. तरीही एक जबाबदार भारतीय म्हणून मी हे सांगू इच्छितो की जर मी अनपेक्षितपणे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. भारत आणि भारतातील लोकांसाठी माझं प्रेम सदैव राहिलं’, असं युवराज सिंग म्हणाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT