Astrology : सूर्याच्या अश्विनी नक्षत्रातील प्रवेशामुळे ग्रहांचा मार्ग बदलेल अन् 'या' राशीतील लोकांचं नशीब उजळेल

Astrology : एप्रिल 2025 मध्ये सूर्य ग्रह हा अश्विनी नक्षत्रात प्रवेश केल्याने एक महत्त्वपूर्ण ज्योतिषीय बदल मानला जातो. हे संक्रमण 14 एप्रिल रोजी सकाळी 9:38 वाजता सुरु होईल आणि 28 एप्रिलपर्यंत चालेल. हा काळ अनेक राशींसाठी नवीन सुरुवात आणि संधीचा काळ मानला जातो. 

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/5

एप्रिल 2025 मध्ये सूर्य ग्रह हा अश्विनी नक्षत्रात प्रवेश केल्याने एक महत्त्वपूर्ण ज्योतिषीय बदल मानला जातो. हे संक्रमण 14 एप्रिल रोजी सकाळी 9:38 वाजता सुरु होईल आणि 28 एप्रिलपर्यंत चालेल. हा काळ अनेक राशींसाठी नवीन सुरुवात आणि संधीचा काळ मानला जातो. 
 

Astrology

2/5

सूर्य ग्रह हा आत्मविश्वास, आदर आणि नेतृत्वाचे प्रतीक मानला जातो. केतूच्या अंतर्गत अश्विनी नक्षत्रात प्रवेश करेल, त्यानंतर जीवनात अचानक बदल निर्माण होईल, याचा काही राशीतील लोकांच्या जीवनावर परिणाम होईल. 
 

Astrology

3/5

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. या काळात आत्मविश्वास वाढू शकतो आणि कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. करिअरमध्ये नवीन मार्ग खुले होण्याची अधिक शक्यता आहे. 
 

Astrology

4/5

मिथुन 

मिथुन राशीसाठी, हे संक्रमण आर्थिक चालना देणारे ठरू शकते. बऱ्याच कळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण लाभाचे संकेत मिळत आहेत. 
 

Astrology

5/5

सिंह 

सिंह राशीतील नोकरदारांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते.
  
 

रिलेटेड चित्र गॅलरी