Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी लावा घड्याळ, तुम्हाला मिळेल यश आणि प्रचंड सुख!
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार, घरातील घड्याळाची दिशा आपल्या जीवनातील घटनांवर प्रभाव टाकू शकते. वास्तुविशारदांच्या मते, घरातील काही दिशेत घड्याळ लावल्याने आयुष्यात नकारात्मक प्रभाव पडू शकतो. तसेच, योग्य दिशेत घड्याळ लावल्याने चांगले बदल घडू शकतात. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घरातील कोणत्या दिशेत घड्याळ लावू नये?
घरात चुकीच्या दिशेत घड्याळ लावल्याने काय होतं?
घरात कोणत्या दिशेत घड्याळ लावणं शुभ असतं?
Vastu tips Wall Clock: मुंबईच्या दादरमध्ये राहणाऱ्या गौरव आणि नेहाने (काल्पनिक नाव) नुकताच त्यांच्या नवीन घरात प्रवेश केला होता. चांगली नोकरी, उत्तम व्यवसाय आणि आनंदी जीवन, असं सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र, काही महिन्यांनंतर त्यांना हळूहळू वाईट अनुभव दिसायला लागले. गौरवची व्हावी तशी प्रगती होत नव्हती. तसेच, नेहाची तब्येत बिघडत चालली होती. या सगळ्याचा परिणाम त्या दोघांच्या नात्यावर होत होता. मात्र, या अडचणी का येत आहेत? याबद्दल त्यांना काहीच कgळत नव्हतं.
या सगळ्या सुरू असतानाच त्यांच्या घराच्या शेजारील ताई काही कामानिमित्त नेहाकडे आली. नेहा अस्वस्थ असल्याचं ताईने पाहिलं. त्या ताईने नेहाला याचं कारण विचारल्यानंतर सुरुवातीला नेहाने याबद्दल सांगण्यास टाळलं. नंतर काही वेळात मात्र नेहाने तिच्या आयुष्यात येत असलेल्या सगळ्या अडचणींविषयी सांगितलं. त्यावेळी, नेहाच्या घरातील भिंतीवर असलेल्या घड्याळाकडे ताईचं लक्ष गेलं. ते पाहिल्यानंतर, ताईने नेहाला ते घड्याळ भिंतीवरील त्या जागेवरुन काढून दुसऱ्या ठिकाणी लावण्याचा सल्ला दिला.
ज्योतिषशास्त्रात, घरातील भिंतीवरील घड्याळाची दिशासुद्धा महत्त्वपूर्ण मानली गेली आहे. याविषयी सुप्रसिद्ध वास्तुविशारद कमल नंदलाल म्हणतात, "घरातील घड्याळाची दिशा व्यक्तीच्या नशिबावर परिणाम करु शकते. त्यांच्या मते, घरातील दक्षिण आणि पश्चिम दिशेत लावलेली घड्याळे काळात सुरळीत चालण्यात व्यत्यय आणू शकतात. तसेच, घरातील उत्तर किंवा पूर्व दिशेत लावलेली घड्याळे वेळेला गती देऊ शकतात. भिंतीवर लावलेल्या घड्याळाचा आयुष्यावर कसा परिणाम होतो? सविस्तर जाणून घ्या.
हे ही वाचा: Astro: कपाळावर टिळा लावल्याने बदलतं नशीब! तुम्हालाही होईल प्रचंड फायदा
घरातील दिशेत घड्याळ लावण्याची चुक करु नका
दक्षिण दिशा (South Wall) : वास्तुनुसार, दक्षिण दिशा ही यमाची दिशा असल्याचे मानले जाते. या दिशेत घड्याळ लावल्याने जीवनात प्रगती थांबू शकते. हे घराच्या प्रमुख व्यक्तीच्या आरोग्यासाठी देखील धोकादायक ठरू शकते.









