मुख्यमंत्रीपदाबद्दल अजित पवार म्हणाले, “वेळ कधी येईल ते सांगता येत नाही”
भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांच्या समर्थकांनी पुण्यात बॅनर्स लावले. यावर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली.

Ajit Pawar Reaction On Chief Minister Post : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीनंतर रविवारी (10 सप्टेंबर) जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अजित पवारांचा रोड शो पार पडला. या रोड शोच्या पार्श्वभूमीवर अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकले. यावरूनच अजित पवारांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी भूमिका मांडली.
पुण्यात अजित पवारांचा रोड शो झाला. त्यापूर्वी माध्यमांनी त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून तुमचे पुण्यात बॅनर्स लागलेत, असा प्रश्न केला. यावर बोलताना अजित पवारांनी सांगितलं की, “अलिकडे नवीन फॅड महाराष्ट्रात निघालं आहे. अनेक ठिकाणी अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते… तुम्ही जर बघितलं, तर माझे बॅनर्स लागलेत. काही ठिकाणी राज ठाकरेंचे बॅनर्स लागलेत. काही ठिकाणी पंकजा मुंडेंचे बॅनर्स लागलेत. कार्यकर्त्यांचा उत्साह असतो.”
हेही वाचा >> Maratha Reservation : तामिळनाडूत 59 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात 50 टक्के मर्यादा का?
145 चा असेल तर मुख्यमंत्री
“मागे राष्ट्रवादी भवनच्या बाहेर एक दिवस माझे, एक दिवस जयंत पाटलांचे आणि एक दिवस सुप्रिया सुळे यांचे बॅनर लागले होते. हे आम्ही सांगत नाही. बॅनर लावून सांगितलं म्हणजे तसं होत नाही. मुख्यमंत्रीपद मिळवायचं असेल, तर 145 चा आकडा… जो हा आकडा गाठू शकतो, तो मुख्यमंत्री होऊ शकतो. जसं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी गाठला. आता एकनाथ शिंदेंनी गाठला”, असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा >> Shiv Sena च्या युती-आघाडीचा काय आहे इतिहास, कसं वापरलंय धक्कातंत्र?
नशीबाचा भाग असतो… अजित पवार काय बोलले?
तुम्हाला उशीर झाला? या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “मी तसं म्हणणं बरोबर नाही, पण प्रत्येकाच्या नशीबाचा भाग असतो. वेळ कधी येईल ते सांगता येत नाही. आपलं काम करत राहायचं. शेवटी जनतेचे प्रेम घेत, बहुजनांचे प्रश्न सुटले पाहिजेत. सर्वांना न्याय देता आला पाहिजे. कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. हा आमचा दृष्टिकोण आहे. आमचा निर्णय बहुजनांच्या विकासासाठी घेतला.”