Kirit Somaiya: आक्षेपार्ह Video वर सोमय्यांची 12 तासानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एक कथित Video प्रसारित झाल्यानंतर त्याबाबत त्यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT

Latest Political News Maharashtra: मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक कथित व्हिडिओ काल (17 जुलै) समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास सोमय्यांच्या संबंधित कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यासह भाजपवर तुफान हल्ला चढवला. मात्र, काल याबाबत सोमय्या किंवा भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र, आता तब्बल 14 तासानंतर किरीट सोमय्या यांनी याविषयीची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (alleged video of bjp leader kirit somaiya viral his first reaction tweet letter to dcm devendra fadnavis latest news of maharashtra politics)
खरं तर किरीट सोमय्या हे अतिशय आक्रमक भाजप नेते म्हणून ओळखले जातात. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर कारवाई होत असताना किरीट सोमय्या हे थेट माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया द्यायचे किंवा सोशल मीडियातून संवाद साधायचे. मात्र, काल कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर सोमय्या हे नॉट रिचेबल झाले होते. अखेर आज (18 जुलै) थोड्या वेळापूर्वीच सोमय्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत एक ट्विट केलं आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करणारं पत्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलं आहे.
‘त्या’ Video नंतर किरीट सोमय्यांचं पहिलं ट्विट
‘एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे.’
हे ही वाचा >> भाजप नेते किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह Video व्हायरल, विरोधकांची भाजपवर तुफान टीका
‘माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी देवेंद्र फडणवीस यांना विनंती.’ असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.