Fact Check: लंडनमधील ‘ती वाघनखं’ खरंच शिवाजी महाराजांनी वापरलेली, काय आहे सत्य?

निरंजन छानवाल

Fact Check about Tiger Claws Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाखनखं यावरुन राज्यात आता नवा वाद सुरू झाला आहे. त्यामुळेच लंडनमधील ‘ती’ वाघनखं नेमकी कोणती याबाबत मुंबई Tak ने फॅक्ट चेक करून यातील सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT

fact check tiger claws wagnuck in london was actually used by chhatrapati shivaji maharaj what is the truth
fact check tiger claws wagnuck in london was actually used by chhatrapati shivaji maharaj what is the truth
social share
google news

Tiger Claws Chhatrapati Shivaji Maharaj: महाराष्ट्र सरकार लंडनच्या म्युझियममधून तीन वर्षांसाठी वाघनखं (Tiger Claws) महाराष्ट्रात आणणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी (hhatrapati Shivaji Maharaj) वापरलेली ही वाघनखं असल्याचं दावा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जात आहे. या दाव्यासोबतच आता प्रतिदावेही केले जाऊ लागले आहेत. नेमकं ज्या म्युझियममधून ही वाघनखं आणली जात आहे, त्या म्युझियमचं याविषयीचे काय दावे आहेत, तिथे आणखी अशी किती वाघनखं आहेत, याचा धांडोळा (Fact Check) घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. लंडनमधील म्युझियमकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच ही सगळी तथ्य मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल. (fact check tiger claws wagnuck in london was actually used by chhatrapati shivaji maharaj what is the truth)

लंडनमधील साऊथ केंग्जिंटन येथे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम आहे. या वस्तुसंग्रहालयात जगभरातील विविध देशांमधून जमा करण्यात आलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी हॉल क्रमांक 41 मध्ये दक्षिण आशिया विभाग आहे. याच दक्षिण आशिया विभागाच्या शस्त्र आणि सशस्त्र सेक्शनमध्ये वाघनखं ठेवण्यात आली आहे. जी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली असल्याचा दावा करण्यात येत आहेत.

तसं तर साऊथ केंग्जिंटनच्या म्युझियमधील या विभागात इतिहासकालीन तब्बल 1,995 शस्त्र आणि कवच आहेत. त्यातील काहीच वस्तू या म्युझियमच्या दर्शनी भागात ठेवण्यात आल्या आहेत.

ज्या वाघनखांसंदर्भात दावा करण्यात येत आहे, त्या वाघनखांसोबतच याठिकाणी औरंगजेबची तलवार, टिपू सुलतानने वापरलेल्या वस्तू, होळकर घराण्यातील काही वस्तू येथे आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp