संजय पवार यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, ‘ती’ जाहिरातबाजी भोवली
जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात आले आहे. संजय पवार यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केल्यामुळे चर्चेत आलेल्या संजय पवार यांची पक्षाकडून अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. संजय पवार यांनी धरणगाव बाजार समिती निवडणुकीत नव्या पॅनेलचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले होते. त्याचबरोबर भाजपचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या जाहिरातीत अजित पवार आणि शरद पवार-नरेंद्र मोदी यांचे फोटोही दिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी संजय पवार यांना पक्षातून बडतर्फ केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह, पक्ष नेत्यांचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पक्षाच्या वतीने गर्जे यांनी दिला आहे.
दोन जाहिराती, एक पॅनेल… संजय पवारांनी नेमकं काय केलं?
संजय पवार यांनी जळगाव जिल्हा बँक चेअरमनपदाच्या निवडणुकीवेळीच पक्षाविरोधात बंडाचं निशाण फडकावलं होतं. या निवडणुकीत पवारांनी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराचा पराभव केला होता.
दरम्यान, धरणगाव कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत संजय पवार यांनी शिवसेना (शिंदे)-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनेल स्थापन करून निवडणूक लढवली.