Maharashtra HSC Board 2022 Result : बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (८ जून) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल महामंडळाच्या संकेतस्थळावर बघता येणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही निकालाबद्दल ट्विट करत माहिती दिलीये. बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण पाहता […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (८ जून) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल महामंडळाच्या संकेतस्थळावर बघता येणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही निकालाबद्दल ट्विट करत माहिती दिलीये.
बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण पाहता येणार आहेत. त्याचबरोबर त्याची प्रिंट घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांकडून १७ जून रोजी दुपारी ३ वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी दिली.
राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खाली देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावर (web sites) उद्या दुपारी १ नंतर पाहता येणार आहे.