Maratha Reservation : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं! CM एकनाथ शिंदे आल्यानंतर काय घडलं?
मराठा आरक्षण आणि मराठा जातीतील लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी सुरु केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी 14 सप्टेंबर रोजी मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सरबत पिऊन त्यांनी उपोषण सोडले.
ADVERTISEMENT

Manoj Jaragne stop hunger strike : मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण आज सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरवली सराटी इथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण थांबवत असल्याची घोषणा केली.
मराठा आरक्षण आणि मराठा जातीला कुणबी म्हणून जातप्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलं होतं. गेल्या 15 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं. उपोषण सुरू असतानाच पोलिसांनी लाठीमार केल्यानं हे उपोषण चर्चेत आले होते.
हेही वाचा >> Maratha Reservation : तामिळनाडूत 69 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात का अशक्य?
दरम्यान, मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले, तरच उपोषण मागे घेणार असल्याची अट घातली होती. त्यामुळे 14 सप्टेंबर रोजी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि इतर नेत्यांसह मनोज जरांगेंची भेट घेतली.
मनोज जरांगेंनी उपोषण थांबवण्याची केली घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्त सरबत पिले आणि उपोषण थांबवत असल्याची घोषणा केली.