Monkeypox चा कहर वाढला, मुंबई महापालिकेने पावलं उचलत केली ‘ही’ तयारी
कोरोना विषाणूचा कहर जगभराने पाहिला आहे. अशात आता मंकीपॉक्स हा नवा आजार डोकं वर काढू लागला आहे. भारतात या आजाराचा रूग्ण अद्याप आढळलेला नाही. तरीही मुंबई महापालिकेने आणि राज्य सरकारने खबरदारीची पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे. मुंबई महापालिकेने सगळ्या रूग्णालयांना सतर्क केलं आहे. मंकीपॉक्स या आजाराबद्दल काही प्रमुख मुद्दे मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे […]
ADVERTISEMENT

कोरोना विषाणूचा कहर जगभराने पाहिला आहे. अशात आता मंकीपॉक्स हा नवा आजार डोकं वर काढू लागला आहे. भारतात या आजाराचा रूग्ण अद्याप आढळलेला नाही. तरीही मुंबई महापालिकेने आणि राज्य सरकारने खबरदारीची पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे. मुंबई महापालिकेने सगळ्या रूग्णालयांना सतर्क केलं आहे.
मंकीपॉक्स या आजाराबद्दल काही प्रमुख मुद्दे
मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे जो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट भागात आढळतो आणि इतर प्रदेशांमध्ये प्रसारित होत आहे.
मंकीपॉक्सचे चिकिस्तिय सादरीकरण (clinical presentation) देवि रोगा सारखे आहे, देवी रोग हा ऑर्थोपॉक्सवायरल संसर्ग असुन 1980 मध्ये या रोगाचे संपूर्ण जगभरात निर्मूलन झाले असे घोषित केले होते. मंकीपॉक्स देवि रोगा पेक्षा कमी संसर्गजन्य आहे आणि कमी गंभीर आहे.