Narendra Modi Pune visit :शरद पवार एकटेच बसले, मोदी पुण्यात आल्यानंतर काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात हा कार्यक्रम पार पडला.
ADVERTISEMENT

Narendra Modi pune visit today : प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात (pm modi pune visit) आले. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात अनेक घटना घडल्या. पंतप्रधानांनी पुण्यात आल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा केली. पण, यातील काही गोष्टींची चांगलीच चर्चा होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सकाळी पुणे विमानतळावर आगमन झालं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने कृषी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर पोहोचले. तिथून मोदी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे रवाना झाले. मंदिरात जाऊन मोदींनी पूजा आणि आरती केली.
मोदींच्या स्वागतासाठी कोण कोण आलं?
कृषी महाविद्यालय परिसरातील हेलिपॅडवर पंतप्रधान मोदींचं आगमन झालं. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, मुख्य सचिवांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.