शिवाजी महाराज वाघनखे : लंडनच्या संग्रहालयातील ‘ती’ वाघनखं खरी की खोटी, वाद काय?
shivaji maharaj wagh nakh controversy in marathi : लंडनमधील संग्रहालयातील वाघनखं खरी की खोटी असा वाद सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं याबद्दल इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. यात आता राजकीय नेत्यांनीही शंका उपस्थित केल्या आहेत.
ADVERTISEMENT

Shivaji Maharaj Wagh Nakh Controversy : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. लंडनमधील संग्रहालयात ही वाघनखे असून, ती परत आणली जाणार आहेत. दरम्यान, या वाघनखांवरून नवा वाद उभा राहिला आहे. यावरून राजकारण तापू लागलं आहे. इतिहासातील काही दाखले देत याबद्दल शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इतिहास अभ्यासकांचे दाखले दिले आहेत. दुसरीकडे शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) इशारा दिला आहे. त्यामुळे हा वाद काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (The Wagh Nakh weapon was famously used by Chhatrapati Shivaji Maharaj to kill Bijapur Sultanate’s general, Afzal Khan, in 1659.)
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. 3 ऑक्टोबर रोजी लंडन येथील वाघनखे भारतात आणण्यासाठी एमओयू होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात वाघनखे भारतात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी रवाना होण्यापूर्वी सांगितलं. त्यानंतर हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
“शिवरायांचं नाव घेऊन फसवाफसवी केलीत तर महागात पडेल!”
वाघनखे महाराष्ट्रात आणली जाणार असल्याचा विषयाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर शिवसेनेने (युबीटी) एक ट्विट केले, ज्यात म्हटलं आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर भारतभरातल्या शिवभक्तांसाठी शिवरायांपेक्षा मोठं काहीच नाही!”
“पण, म्हणून आमच्या भावनांशी खेळू नका. अर्धसत्य सांगून स्वतःची राजकीय पोळी भाजू नका! लंडनच्या वस्तू संग्रहालयात जर खरंच शिवरायांचीच वाघनखं असतील, तर ती कायमस्वरूपी महाराष्ट्रात यायला हवीत आणि त्या वाघनखांचा सन्मान रहावा, यासाठी शिवछत्रपतींचं मंदिर उभारून त्यात ती ठेवण्यात यावी”, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पण, ती खरी आहे का? अशी शंकाही शिवसेनेने अप्रत्यक्षपणे उपस्थित केली आहे.
Afzal Guru ला फाशी देताच जेलर ढसाढसा रडला, कधीही समोर न आलेला ‘हा’ किस्सा जरूर वाचा!
पुढे म्हटलं आहे की, “पण जर का ती वाघनखं शिवरायांची असल्याचा पुरावा नसेल, तर भावनांशी खेळत जनतेला मूळ विषयांपासून भरकटवण्यासाठी तोतयेपणा करू नका. शिवरायांचं नाव घेऊन फसवाफसवी केलीत, तर महागात पडेल”, अशी भूमिका शिवसेनेने (युबीटी) मांडली.