Today Gold Price: आता आपण फक्त आकडे मोजायचे... याचा 'पॅटर्नच' आहे वेगळा, सोन्याचे भाव ऐकून फुटेल घाम!
Gold Price Today, आजचा सोन्याचा भाव : गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि सराफा बाजारात दोन्ही ठिकाणी सोन्याचे दर वाढले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate, आजचा सोन्याचा भाव : गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि सराफा बाजारात दोन्ही ठिकाणी सोन्याचे दर वाढले आहेत. आज शुक्रवारी 18 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मार्केट एक्सपर्टनुसार, येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव एक लाखांच्या पुढे जाणार आहेत.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97 हजारांच्या पार झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89 हजारांच्या पुढे गेले आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 97 हजारांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
गुड्स रिटर्न वेबसाईटनुसार आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97580 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 89450 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97580 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 89450 रुपये झाले आहेत.










