Kirit Somaiya: आक्षेपार्ह Video वर सोमय्यांची 12 तासानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

After an alleged video of BJP leader Kirit Somaiya went viral, his first reaction has come out. He has tried to present his side by tweeting about this. letter to dcm devendra fadnavis
After an alleged video of BJP leader Kirit Somaiya went viral, his first reaction has come out. He has tried to present his side by tweeting about this. letter to dcm devendra fadnavis
social share
google news

Latest Political News Maharashtra: मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक कथित व्हिडिओ काल (17 जुलै) समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास सोमय्यांच्या संबंधित कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यासह भाजपवर तुफान हल्ला चढवला. मात्र, काल याबाबत सोमय्या किंवा भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र, आता तब्बल 14 तासानंतर किरीट सोमय्या यांनी याविषयीची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (alleged video of bjp leader kirit somaiya viral his first reaction tweet letter to dcm devendra fadnavis latest news of maharashtra politics)

खरं तर किरीट सोमय्या हे अतिशय आक्रमक भाजप नेते म्हणून ओळखले जातात. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर कारवाई होत असताना किरीट सोमय्या हे थेट माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया द्यायचे किंवा सोशल मीडियातून संवाद साधायचे. मात्र, काल कथित व्हिडीओ समोर आल्यानंतर सोमय्या हे नॉट रिचेबल झाले होते. अखेर आज (18 जुलै) थोड्या वेळापूर्वीच सोमय्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत एक ट्विट केलं आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करणारं पत्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलं आहे.

‘त्या’ Video नंतर किरीट सोमय्यांचं पहिलं ट्विट

‘एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> भाजप नेते किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह Video व्हायरल, विरोधकांची भाजपवर तुफान टीका

‘माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी देवेंद्र फडणवीस यांना विनंती.’ असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहलेलं पत्र जसंच्या तसं:

आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> वासनांध प्रदीप कुरुळकरचे कारनामे! कार्यालयातील बाथरूममध्येच महिलांसोबत…

अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार…. झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे.

ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे.

अशा आशयाचं पत्र किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहलं आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर आतापर्यंत भाजपने फारच सावध भूमिका घेतली आहे. त्यांच्या एकाही नेत्याने, प्रवक्ताने किंवा आमदाराने याबाबत पक्षाची काय भूमिका आहे हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

नेमकं प्रकरण काय?

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील एक व्हिडिओ चॅट काल समोर आला होता. ज्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. ज्यानंतर विरोधी पक्षातील नेते अत्यंत आक्रमक झाले. किरीट सोमय्या यांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला होता. सोमय्यांबाबतचे हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या.

या संपूर्ण मुद्द्यावरुन एकीकडे विरोधी पक्षातील नेते आक्रमक झालेले असले तरी भाजपकडून कोणत्याही नेत्याची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाह. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाबाबत भाजप नेते काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT