Beer : ना ब्रँडेड, ना थंडगार… राजधानीत बिअरप्रेमी शोकसागरात; काय आहे कारण?
दिल्लीत विविध नामांकित ब्रँड्सची त्यातही थंडगार बिअर मिळत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. पण लोकप्रिय ब्रँडची थंड बिअर मिळत नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी मत्र फेटाळून लावला आहे.
ADVERTISEMENT
Beer news :
ADVERTISEMENT
उन्हाळा आला की मद्यप्रेमींची पावलं थंडगार बिअरकडे (Beer) वळतात. आपल्या आवडत्या ब्रँडची थंड बिअर पिऊन चिल होण्याच प्रयत्नात ते असतात. मात्र देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) बिअरप्रेमींची निराशा झाली असून, लोकांना दुकानातून रिकाम्या हाताने परतावं लागत आहे. दिल्लीत विविध नामांकित ब्रँड्सची त्यातही थंडगार बिअर मिळत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. पण लोकप्रिय ब्रँडची थंड बिअर मिळत नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी मत्र फेटाळून लावला आहे. (At the beginning of summer in Delhi, customers are unable to get famous brands and cold beer)
नेमकं काय आहे प्रकरण?
दिल्लीतील सध्या उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत, 550 हून अधिक दुकानांमधून दारूची विक्री केली जाते. ही सर्व दुकानं सरकारी आहेत. याच दुकानांमधून सध्या रेफ्रिजरेटरसाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती आहे. पण लवकरच दुकानांमध्ये रेफ्रिजरेटर बसवले जातील, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. याचमुळे बहुतांश दारूच्या दुकानांतून मोठ्या ब्रँडची बिअर गायब आहे. तर ज्या दुकानांमध्ये बिअर मिळते, तेथेही थंडी मिळत नाही, अशा तक्रारी ग्राहकांकडून सातत्याने केल्या जात असण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा : तुमच्या शरीरात ‘हे’ लक्षणे दिसल्यास तात्काळ दारू पिणे थांबवा
कॅनॉट प्लेसमधील डीएसआयआयडीसी कार्यालयाजवळील दारूच्या दुकानाबाहेर उभ्या असलेल्या एका ग्राहकाने बिअर ब्रँड उपलब्ध नसल्याबद्दल तक्रार केली. त्याने सांगितले की, ज्या ब्रँडची बिअर दुकानात उपलब्ध आहे, ज्यांची नावे मी पहिल्यांदा ऐकत आहे. माझ्या आवडत्या 2-3 ब्रँडपैकी एकाही दुकानात बिअर नाही. त्याचवेळी लक्ष्मीनगरातील अन्य एका ग्राहकाने सांगितले की, दारूच्या दुकानात कोल्ड बीअर मिळत नाही. ग्राहकाने सांगितले की मी एक किंवा दोन बाटल्या घेतो, नंतर घरी थंड झाल्यावर पितो, कारण दुकानांमध्ये सामान्य तापमानाची बिअर मिळते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी दिल्लीकरांनी १.२ कोटी बिअरचे बॉक्स संपवले होते. एका बॉक्समध्ये 24 बाटल्या असतात. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेजेस कंपनीजचे महासंचालक विनोद गिरी यांनी सांगितले की, दिल्लीत दरवर्षी सुमारे 15 कोटी बिअरच्या बाटल्या रिचवल्या जातात. उन्हाळ्याच्या 3 महिन्यांत ही मागणी जास्त असते, 15 कोटी बाटल्यांपैकी केवळ उन्हाळ्यात सुमारे 6 कोटी बाटल्या पिल्या जातात, असं त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
हेही वाचा : आधी मैत्रिणीसोबत भरपूर दारु प्यायला, 2 व्हायग्राच्या गोळ्या खाल्ल्या; नंतर…
दिल्लीत बिअरचा तुटवडा का?
विनोद गिरी यांनी लोकप्रिय बिअर ब्रँड नसण्यामागे इतरही अनेक कारणं सांगितली आहेत.दिल्लीत बिअरचे उत्पादन कमी होणे आणि इतर राज्यांवर अवलंबून असणे हे बिअरच्या तुटवड्याचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. इतर राज्यांतील कंपन्या कर वाचवण्यासाठी स्थानिक मागणी प्रथम पूर्ण करतात, त्यामुळे उन्हाळ्यात दिल्लीत बीअरचा पुरवठा कमी असतो. याशिवाय दिल्लीत कंपनीचे मार्जिन कमी आहे, त्यामुळे कंपन्या अधिक फायदेशीर बाजारपेठेत आधी पुरवठा करतात. सोबतच दिल्लीतील दुकानांमध्ये स्टॉक ठेवण्यासाठी मर्यादित जागा आहे आणि शहरात दुकानांची संख्या कमी आहे. या कारणामुळे साठा साहजिकच कमी असतो, अशीही अनेक कारण गिरी यांनी सांगितली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT