Badlapur: 'माझा पोरगा भोळा, गरीब गाय त्याला पोलिसांनीच...', पाहा अक्षय शिंदेची आई काय-काय म्हणाली!
Akshay Shinde Mother: अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर त्याच्या आई-वडिलांनी माध्यमांशी बोलताना पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातीला आरोपी अक्षय शिंदे ठार
पोलीस चकमकीत अक्षय शिंदेचा मृत्यू
अक्षय शिंदेच्या आईचे पोलिसांवर गंभीर आरोप
Akshay Shinde Mother: बदलापूर: 'माझा पोरगा एकदम भोळा, गरीब गाय आहे.. त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून मारून टाकलं' असा आरोप बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या आईने माध्यमांशी बोलताना केलं आहे. तळोजा तुरुंगातून ठाण्यात नेत असताना पोलीस व्हॅनमध्ये झालेल्या चकमकीत अक्षय शिंदे हा ठार झाला. ज्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. (badlapur sexual assault case my son is a naive like innocent cow he was killed by the police see what akshay shinde mother said after his encounter)
ADVERTISEMENT
अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी पोलीस प्रशासनावर थेट आरोप केले की, त्यांनी पैसे घेऊन आपल्या मुलाची हत्या केली. पाहा अक्षय शिंदेचे आई-वडील नेमकं काय म्हणाले.
'पैसे घेऊन मारून टाकलंय माझ्या पोराला...', अक्षयच्या वडिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप
'आरोप खोटाच आहे.. पैसे घेऊन मारून टाकलंय.. मी काय म्हणतोय.. मी त्याला आता 3.30 वाजता भेटून आलोय. त्याला साधी खेळण्यातील बंदूक माहिती नाही पोराला.. तो पोलिसांची बंदूक काय चालवणार? कधी फटाकेही तो फोडत नव्हता.'
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Badlapur Akshay Shinde: पोलिसांनीच धाडला अक्षय शिंदेला यमसदनी... एन्काऊंटरची Inside Story
'मी बातम्या बघितलं तेव्हा मला कळलं, आम्हाला पोलिसांनी काही सांगितलं नाही.' असा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केला आहे.
'माझा पोरगा एकदम भोळा, गरीब गाय आहे', पाहा अक्षय शिंदेची आई काय म्हणाली...
'मी पोलिसांनी विचारलं की, तुम्ही अक्षय शिंदेला का घेऊन येत नाही? तर पोलीस बोलले की, अक्षय शिंदेला ना इथे बघितलं ना तर मारून टाकतील. त्याचा रेकॉर्ड लय मोठा झाला आहे. असं बोलत होते ते..'
ADVERTISEMENT
'मी माझ्या पोरासोबत बोलत होते. पोरगा बोलला मम्मी माझं चार्जशीट देखील आलं नाही.. मला केव्हाच उडवतील हे लोकं.. मी म्हटलं बाबा थांब.. जरा बघू आपण.. चार्जशीट पण आली नाही पोरगा बोलला मला.'
ADVERTISEMENT
'त्याच्या हातात एक पेपर पण दिला होता.. त्यात काही तरी लिहलं होतं. तो मला दाखवत होता. पण मला काही समजत नव्हतं. मी बोलली मला काही वाचता येत नाही.'
हे ही वाचा>> Badlapur News: आधी पोलिसांवर गोळीबार अन् नंतर अक्षय शिंदेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
'माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं. माझी भरपाई करून द्या. नाही तर आम्ही तिथे येऊ.. आम्हाला पण गोळ्या घाला. आम्ही पण मरायला तयार. माझ्या पोराने कधी फटाके नाही वाजवले. दिवाळीच्या वेळेस एखादा फटाका वाजवायला पण माझा पोरगा घाबरायचा. माझा पोरगा असं करू शकत नाही. पैसे देऊन पोराला मारून टाकलं.'
'घरातून पण आम्हाला हाकलून टाकलंय.. आम्ही स्टेशनवर इकडे-तिकडे फिरतोय. माझ्या पोराची मी वाट बघतेय. माजा पोरगा केव्हा निघेल.. माझा पोरगा असं करुच शकत नाही..'
'शाळेत दुसरंच कोणीतरी अत्याचार केले. माझ्या पोरावर आरोप करून त्याला आत टाकला. 12-13 तारखेपासून त्यांना माहिती होतं शाळेमध्ये. माझा पोरगा पार 17 तारखेपर्यंत शाळेत गेलाय. तसं केलं असतं तर माझा पोरगा शाळेत कशाला गेला असता कामाला? तसं केलं असतं तर कामाला गेलाच नसता.'
'माझा पोरगा हा एकदम भोळा आहे. असं कोणाचं काय करणार नाही माझा पोरगा.. माझ्या पोराला गोळी मारून टाकलं.. आम्हाला पण गोळी मारून टाका.. आम्ही येतो तिथे.. कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय ना तिथे ठेवलंय.. माझा पोरगा ना गरीब गाय आहे.. माहितीए..'
'माझ्या पोराला आम्ही आई-बापाने काय घाण सवय नाही लावली कुठली..'
'काही म्हणतात ते.. माझा पोरगा कधी फटाका वाजवत नव्हता. मी कामावर गेली तर रोड क्रॉस करताना त्याला हाताला धरून न्यायची. माझा पोरगा गाड्यांना पण घाबरायचा.. आता आम्हाला पण गोळ्या टाकून मारा. शाळेमध्ये सहा बायका आहेत कामाला. त्या बायका पळून गेल्या त्यांना का पकडत नाही?' असा सवाल करत अक्षय शिंदेच्या आईने काही गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT