चंद्राबाबू नायडूंचा 371 कोटी घोटाळ्याचं नेमकं प्रकरण काय?; CID कडून का झाली कारवाई
chandrababu naidu : चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदावर असताना पदाचा गैरवापर करत 371 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ठेऊन त्यांना अटक झाली आहे. आता सीआयडीने तपास सुरु करुन त्यांनी मोठी रक्कम कशी आणि कुठे वळवली आहे त्याचा तपास सुरु केला आहे.
ADVERTISEMENT

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशाचे विभाजन होण्याआधीचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी सकाळी राज्य सीआयडीने अटक केली. राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळाच्या (APSSDC)नावाखाली 371 कोटी रुपयांच्या मोठ्या घोटाळा केल्या असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
माझ्या मातृभूमीची सेवा
चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, गेल्या 45 वर्षांपासून मी निस्वार्थपणे तेलुगू लोकांची सेवा केली आहे. तेलुगू लोकांच्या हितासाठी मी माझे प्राणही द्यायला तयार आहे. जगातील कोणतीही शक्ती मला तेलगू लोकांची, माझ्या आंध्र प्रदेशाची आणि माझ्या मातृभूमीची सेवा करण्यापासून रोखू शकत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा >>Rajendra Gudha : अशोक गेहलोत सरकारला हादरवून सोडणाऱ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार
चंद्राबाबू नायडू यांना या कथित घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मानले जातात. त्यांच्यावर सार्वजनिक पैसे शेल कंपन्यांच्या माध्यमातून खाजगी संस्थांकडे हस्तांतरित करण्याची योजना आखली होती. त्यामुळे सार्वजनिक तिजोरीचे नुकसान झाले होते आणि खाजगी फायदा झाला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
बनावट पावत्या
चंद्राबाबू नायडू यांनी काळजीपूर्वक योजना आखली होती. त्यानंतर 371 कोटी रुपयांचा घोटाळा केला गेला. तर सरकारने दिलेला बहुतांश पैसा शेल कंपन्यांना बनावट पावत्यांद्वारे पाठवला गेला होता. त्यावर नमूद केलेल्या वस्तूंचा कोणताही संदर्भ नव्हता. नायडू यांच्या कार्यकाळात, राज्य सरकारने जर्मन अभियांत्रिकी कंपनी Siemens सह सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती असाही आरोप त्यांच्यावर आहे.