Ahmednagar : शेवगावमध्ये दोन गट भिडले! तुफान दगडफेक, वाहनांची तोफफोड

मुंबई तक

शेवगाव शहरात एका गटाकडून मिरवणुकीचं आयोजन करण्यत आलं होतं. सायंकाळी 5.30 वाजता निघालेल्या या मिरवणुकीवर दुसऱ्या दुसऱ्या गटाने दगडफेक केल्याचं म्हटलं जात आहे. त्यातूनच ही घटना चिघळली आणि दगडफेक सुरू झाली.

ADVERTISEMENT

Maharashtra News : stone pelting in shevgaon ahmednagar : Another group pelted stones on this procession which started at 5.30 pm. The dispute escalated and both groups started pelting stones at each other.

social share
google news

अहमदनगर शहरात झालेल्या हिंसाचाराच्या घटना विस्मरणात जात नाही, तोच जिल्ह्यातील शेवगामध्ये दोन गटात तुफान राडा झाला. शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याचा दावा करत दुसऱ्या गट आक्रमक झाला आणि दगडफेक केली. दोन्ही गटांनी रस्त्यावर असलेल्या वाहनांना लक्ष्य करत तोडफोड केली. या घटनेत अनेक घरांच्या काचाही फुटल्या आहेत. पोलिसांनी जमावाला पांगवत शहरात शांतता प्रस्थापित केली. सध्या शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

शेवगाव शहरात एका गटाकडून मिरवणुकीचं आयोजन करण्यत आलं होतं. सायंकाळी 5.30 वाजता निघालेल्या या मिरवणुकीवर दुसऱ्या दुसऱ्या गटाने दगडफेक केल्याचं म्हटलं जात आहे. त्यातूनच ही घटना चिघळली आणि दगडफेक सुरू झाली.

शेवगावमध्ये नेमकं काय घडलं?

मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केली. त्यानंतर मिरवणुकीत सहभागी लोक भडकले आणि त्यांनीही दगडफेक करण्यास सुरुवात केली. दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या दगडफेकी लोकांच्या वाहनांसह घराचंही नुकसान झालं आहे.

भडकलेल्या जमावाने दुकानांवरही दगडफेक सुरू केली. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. जमावाने रस्त्यावरील दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड केली. त्याचबरोबर घरांच्या दिशेनेही दगड भिरकावले, त्यामुळे खिडक्या फुटल्याचे प्रकारही घडले.

हे वाचलं का?

    follow whatsapp