Corona: मुंबईकरांना Covid अलर्ट, मास्क सक्तीबाबत झाला मोठा निर्णय!

मुंबई तक

कोविडची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खबरदारी म्हणून 60 वर्ष वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मास्क लावावं असं आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

ADVERTISEMENT

all employees patients visitors in municipal hospitals have to wear masks compulsory
all employees patients visitors in municipal hospitals have to wear masks compulsory
social share
google news

Corona in Mumbai: मुंबई: देशातील विविध राज्यांमध्ये कोविड-19 (Covid-19) विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केली आहे. विशेषतः 60 वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक आहे. मात्र महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचे असेल, असेही चहल यांनी निर्देश दिले. (Corona increased concern all employees patients visitors in municipal hospitals have to wear masks compulsory)

कोविडच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी चहल यांनी आज (दिनांक १० एप्रिल २०२३) तातडीची आढावा बैठक घेतली.

याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त चहल म्हणाले की, ‘केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविड रूग्णसंख्या वाढीबाबतचा वर्तवलेला अंदाज पाहता संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. सक्ती नसली तरी काही मार्गदर्शके खबरदारीचा उपाय म्हणून निर्गमित करावयाची आहेत. वैद्यकीय अंदाजानुसार येत्या मे महिन्यामध्ये कोविड संसर्गाच्या रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, मुंबईतील महानगरपालिकेच्या सोबतच खासगी रुग्णालयांच्या ठिकाणीही रूग्णशय्या सज्ज ठेवणे आवश्यक आहे’, असे सांगून आयुक्तांनी विविध सूचना याप्रसंगी केल्या. त्या संक्षिप्तपणे पुढीलप्रमाणे आहेत.

कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज, काय करणार उपाययोजना?

१. औषध इत्यादी खरेदी- महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने महानगरपालिकेची सर्व रुग्णालये मिळून आवश्यक असणारे ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट्स त्याचप्रमाणे औषधसाठा व इतर वैद्यकीय सामुग्री यांचा आढावा घेवून त्यांची आवश्यकता असल्यास खरेदीची प्रक्रिया सुरु करावी, कोणत्याही बाबीचा तुटवडा भासणार नाही, याची खातरजमा करण्यात यावी.

हे वाचलं का?

    follow whatsapp